(Source: Poll of Polls)
Pune PMPML News : क्रिकेट प्रेमींसाठी PMPML कडून खास गिफ्ट; पुण्यातील वर्ल्डकप सामन्यांसाठी जादा बस, तिकीट किती आणि कुठून सुटणार बस?
पुण्यातील वेगवेगळ्या स्थानकावरुन थेट गहुंजे स्टेडियमला जाण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातील क्रिकेटप्रेमी सहजपणे ही मॅच पाहण्यासाठी जाऊ शकणार आहेत.
पुणे : पाच ऑक्टोबरपासून भारतात क्रिकेट (Pune news) विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. (Mens Cricket World Cup 2023) या विश्वचषकातील पाच सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. मात्र याच सामन्यांसाठी PMPML कडून पुणेकरांसाठी खास गिफ्ट देण्यात आलं आहे. पुण्यातील वेगवेगळ्या स्थानकावरुन थेट गहुंजे स्टेडियमला जाण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातील क्रिकेटप्रेमी सहजपणे ही मॅच पाहण्यासाठी जाऊ शकणार आहेत. तब्बल 27 वर्षांनंतर हे सामने पुण्यात होणार असल्यानं क्रिकेटप्रेमी हे सामने पाहण्यासाठी चांगलेच उत्सुक असल्याचं बघायला मिळत आहे.
क्रिकेट शौकिनांसाठी पीएमपीएमएलकडून पुणे मनपा भवन, कात्रज आणि निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मधील एकूण 5 सामने पुणे येथील गहुंजे स्टेडीयम येथे होणार आहेत. मात्र जर या बसेसमध्ये क्रिकेट शौकिनांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार तीनही बस स्थानकांवरून जादा बसेसचे नियोजन करण्यात येईल, असं PMPML प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
क्रिकेट सामन्याचा बसेस सुटण्याचे ठिकाणं
19 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर या दिवशी बसेसची सोय करण्यात आली आहे.
पुणे मनपा- दुपारी 11:00, 11:35, 12 :00 वाजता बस असणार आहे त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रुपये तिकीट असणार आहे.
कात्रज बसस्थानक- दुपारी 11:00, 11:30 वाजता बस असणार आहे. त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रुपये तिकीट असणार आहे.
निगडी बसस्थानक- दुपारी 12:00, 12:30 वाजता बस असणार आहे. त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 50 रुपये तिकीट असणार आहे.
12 नोव्हेंबर
पुणे मनपा- सकाळी 8:24, 8:50, 9 :05 वाजता बस असणार आहे त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रुपये तिकीट असणार आहे.
कात्रज बसस्थानक- सकाळी 8:15, 8:35 वाजता बस असणार आहे. त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रुपये तिकीट असणार आहे.
निगडी बसस्थानक- सकाळी 8:30, 9:00 वाजता बस असणार आहे. त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 50 रुपये तिकीट असणार आहे.
गहुंजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर कधी आणि किती सामने?
19 ऑक्टोबर - भारत vs बांगलादेश
30 ऑक्टोबर - अफगाणिस्तान vs श्रीलंका
1 नोव्हेंबर - न्यूझीलंड vs दक्षिण आफ्रिका
8 नोव्हेंबर - इंग्लंड vs नेदरलँड्स
12 नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया vs बांगलादेश (Day Game)