एक्स्प्लोर

Pune PMPML : राग अनावर झाल्यानं PMPML बस चालकानं बस रिव्हर्स घेतली अन् वाहनांना उडवलं

पुण्यात PMPML बस चालकानं वाहनांना उडवलं आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरची ही दुर्घटना आहे..या PMPM" बस चालकाच्या विरोधात पुण्यातील  चतु:श्रुंगी पोलिसांमध्ये 308 सदोष मनुषवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यात PMPML बस चालकानं वाहनांना उडवलं आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरची ही दुर्घटना आहे..या PMPML बस चालकाच्या विरोधात पुण्यातील  चतु:श्रुंगी पोलिसांमध्ये 308 सदोष मनुषवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. PMPML चालकाचा एका चालकाशी वाद झाला होता. त्याचा राग अनावर झाल्याने वाहकाने थेट वाहनांना उडवलं आहे. निलेश ज्ञानेश्वर सावंत असं चालकाचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

PMPML चालकाचा काही गाडी चालकासोबत वाद झाला होता. त्यावेळी त्याने बस आधी समोर घेतली मात्र त्यानंतर त्याचा राग अनावर झाल्याने त्याने थेट बस रिव्हर्स घेतली. हे पाहून पुण्यातील सेनापती बापट रोडवरील लोकांनी आरडा ओरड सुरु केली. मात्र या सगळ्याला न जुमानता बस चालकाने थेट बस मागे घेत अनेक गाड्यांना उडवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश सावंत हा पीएमपीएमएल बस चालक आहे. तो शनिवारी पीएमपीएमएलची बस क्रमांक एमएच 14, एचयु 5725 हे घेऊन पुणे विद्यापीठाच्या दिशेने जात होता. 

चालकाचा रान अनावर झाला अन्...

प्रवाशांनी भरलेली बस होती. त्यावेळी प्रवाशांनीदेखील या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र संतापलेल्या चालकाने कशालाही न जुमानता बस मागे घेतली. चालक दारुच्या नशेत असल्याचं प्रवाशांनी आणि बघ्यांनी सांगितलं आहे. हा सगळा थरार सेनापती बापट रोडवर असलेल्या इतर नागरिकांनी अनुभवला. यावेळी अनेक नागरिकांना आणि वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला. बसच्या मागे किंवा पुढे जाऊ नका, अशी विनंती केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र बस मागे घेताना ज्या गाड्यांना उडवलं त्या गाड्याचं मोठं नुकसान झालं आहे. सोबतच या गाड्यातील काही नागरिक जखमी  झाल्याचीही माहिती आहे. हा सगळ्या प्रकार कळताच पोलिसांनी या चालकावर कारवाई करत त्याला अटक केली आहे. 

PMPML बस चालकांची अरेरावी संपेनाच! 

 पुण्यात सध्या PMPML बस चालकांची अरेरावी संपायचं नाव घेत नाही आहे. अनेक चालकांच्या हलगर्जीपणामुळे PMPML बसचे अपघात झाल्याचं पाहिलं आहे. त्यातच हा अपघातदेखील समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी PMPML चालकाने दारुच्या नशेत गाडी दोन तरुणांच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला होता. 

इतर महत्वाची बातमी-

Sharad Pawar : बावनकुळेंना भाजपनं तिकीट नाकारलं, त्यांच्यावर काय बोलणार; शरद पवारांचा शेलक्या शब्दांत टोला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त

महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती

'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा

Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट

बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ

Embed widget