एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणेकरांसाठी खूशखबर... पीएमपीएमएल बससेवा पुढील आठवड्यात सुरू होणार
कोरोना आणि लॉकडाऊनमुळं बेजार झालेल्या पुणेकरांसाठी खूशखबर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बससेवा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. तब्बल पाच महिन्यानंतर पीएमपीएमएल रस्त्यावर धावणार आहे.
पुणे : कोरोना आणि लॉकडाऊनमुळं बेजार झालेल्या पुणेकरांसाठी खूशखबर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएमएल बससेवा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. तब्बल पाच महिन्यानंतर पीएमपीएमएल रस्त्यावर धावणार आहे. 22 तारखेला गणेश चतुर्थीला पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे.
यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पीएमपीएमएल प्रशासनानं बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे 22 तारखेला गणेश चतुर्थीला पीएमपीएमएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे.
बस सेवा ठप्प असल्याने पीएमपीएमएलला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासह देखभाल दुरुस्तीचा खर्चही आवाक्याबाहेर गेला आहे. पीएमपीएमएलला प्रतिदिन साधारण दीड कोटीपर्यंत उत्पन्न मिळतं, आतापर्यंत पीएमपीएमएलला साधारण 200 कोटीचा फटका बसला आहे. यासंदर्भात सोमवारी पुणे आणि मंगळवारी चिंचवड मनपा आयुक्त आणि पीएमपीएमएल प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
पहिल्या टप्प्यात साधारण 400 ते 450 बसेस शहरात सुरू होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे. नागरिकांच्या प्रतिसादानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात पीएमपीएमएल सुरू होणार आहे. या निर्णयामुळं सर्वसामान्य पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स संभाळत मर्यादित प्रवाशांना परवानगी दिली जाणार आहे. बस दिवसातून दोन-तीन वेळा निर्जंतुक केली जाईल तसेच बसमध्ये मास्क बंधनकारक करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement