Pune News : फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वर्गाबाहेर काढलं, पालक संतापले...
शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील शाळेत फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वर्गाबाहेर काढलं आहे. पुण्यातील काही शाळांमध्ये दहावीचे एक्स्ट्रा वर्ग सुरु झाले आहेत.
Pune News : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील शाळेत फी न (School fee) भरलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वर्गाबाहेर काढलं आहे. पुण्यातील काही शाळांमध्ये दहावीचे एक्स्ट्रा वर्ग सुरु झाले आहेत. पहिल्याच दिवशी फी न भरल्याने असा प्रकार शाळा प्रशासनाने केल्याने पालक चांगलेच संतापले आहे. मुक्तांगण शाळेत हा प्रकार घडला.
शाळांची भरमसाठ वाढलेली फी अनेकदा पालकांच्या आवाक्याबाहेर जाते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांनी फी थकते. यावरुन शाळा व्यवस्थापन आणि पालकांचे खटके उडाल्याच्या अनेक घटना समोर येतात. फीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळांचे अनेकदा वाद होतात. मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होतं. यावेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी असा प्रकार समोर आल्याने पालकांनी शाळा प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
शाळा व्यवस्थापनाने मुलांना वर्गाबाहेर ठेवल्याचे लक्षात येताच पालकांनी शाळेत जात जाब विचारला. त्यानंतर स्थानिकांना माहिती दिली सोबत स्थानिक राष्ट्रवादी नेते नितीन कदम यांनादेखील या प्रकारासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यांनी देखील शाळेत जात व्यवस्थापनाला जाब विचारला. साधारण 150 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. यावेळी पालकांना शाळेत जात तेथील व्यवस्थापकाला जाब विचारला. त्यावेळी सगळ्यांनी शाळा प्रशासकाकडून मिळालेल्या आदेशाचं पालन करत असल्याचं पालकांनी सांगितलं आहे.
हा सगळा प्रकार पालकांना कळल्यानंतर पालकांनी आणखी संताप व्यक्त केला. अनेक पालक शाळेबाहेर जमले होते. त्यांनी शाळा प्रशासनाला वारंवार जाब विचारला. त्यानंतर शाळेने समोपचाराची भूमिका घेत पालकांची समजूत काढली आणि फि भरण्यासाठी मुदत वाढवून दिल्यानंतर काही वेळाने पालक आणि शाळा प्रशासनाचा वाद मिटला.
कधी बाहेर काढलं तर कधी डांबून ठेवलं?
काही दिवसांपूर्वी शाळेची फी न भरल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार पुण्यात समोर होता. वाघोलीतील लेक्सिकॉन (School fee) शाळेतील ही घटना आहे. वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलची फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर डांबून ठेवल्याप्रकरणी पालकांनी आणि मनसे पदाधिकारी यांनी शाळेविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. संबंधितांवर खंडणी आणि अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांनी यांनी मात्र आरोप फेटाळत पालकांचा गैरसमज झाल्याचं सांगितलं होतं. फी भरा आणि मुलांना घेऊन जा असे शाळेकडून सांगण्यात आल्याचे काही पालकांनी सांगितले. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक धावत पळत शाळेत आले आणि शाळेने केलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली होती.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI