Raj Thackeray Vasant More : वसंत मोरेंच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे थेट पुण्यात, वसंत मोरेंची नाराजी दूर?
मनसे नेते वसंत मोरे यांची त्यांनी भेट घेतली आणि मोरे यांनी पुण्यातील कात्रज भागात श्वान संगोपन केंद्र सुरु केलं आहे.
Raj Thackeray Vasant More : गुढी पाडव्याच्या दमदार सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात येताच ते अॅक्शन मोडवर असल्याचं बघायला मिळालं. मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांची त्यांनी भेट घेतली. मोरे यांनी पुण्यातील कात्रज भागात श्वान संगोपन केंद्र सुरु केलं आहे. या केंद्राचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. राज ठाकरे यांचं श्वान प्रेम सगळ्यांनाच ज्ञात आहे. त्यामुळे त्यांच्याच हस्ते पुण्यातील या भव्य श्वान संगोपन केंद्राचं उद्घाटन केलं.
पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेणार देखील ते घेणार आहे. हा भव्य प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पासाठी सहा हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मनसेकडून आणि अनेक पर्यावरण प्रेमींकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंनी खुद्द या विषयाकडे लक्ष घातलं आहे. त्यांनी या प्रकल्पासंदर्भातील अनेक फोटो आणि कागदपत्र मागवून घेतले आहेत.
पुण्यातील पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा पुन्हा मनसेने उचलून धरला आहे. कालच मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी वकिलांंना सोबत घेत पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्यात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी असलेले दर्गे पाडून त्या ठिकाणी मंदिरं बांधा, अशी मागणी मनसेने केली आहे. मागील वर्षी अजय शिंदे यांनीच राज ठाकरे यांच्या सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र वर्षभर वाट पहिली आणि पुन्हा वर्षभरानंतर काही महिन्यांचा अल्टिमेटम देत त्यांनी राज्य सरकारकडे उत्खननाची मागणी केली आहे. त्यातच आज राज ठाकरेदेखील पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आज राज ठाकरे पुण्येश्वर मंदिराच्या मुद्द्यावर काही बोलतात का? हे पाहणं महत्वाचं होतं. मात्र त्यांनी माध्यमांशी काहीही न बोलता रवाना झाले.
वसंत मोरेंची नाराजी दूर?
पुण्यातील मनसेत मागील काही दिवसांपासून दोन गट पडले आहेत. त्यात वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याच्यादेखील मोठ्या चर्चा झाल्या. काही दिवसांपूर्वी मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे यांना राज ठाकरे यांचा कार्यक्रम उभा राहून बघावा लागला. यामुळे राज ठाकरे त्यांना वारंवार डावलत आहेत का?, अशा चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मनसेत काही दिवसांपासून अंतर्गत वाद सुरु आहे. स्थानिक नेत्यांमध्ये आणि वसंत मोरे यांच्यातले वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे वसंत मोरेंना राज ठाकरे डावलत आहेत की स्थानिक नेते डावलत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.