Pune News Kidney Racket : रुबी हॉस्पिटलमध्ये बनावट किडनी प्रत्यारोपणाची पाच प्रकरणं उजेडात
Pune News Kidney Racket : रुबी हॉस्पिटलमध्ये बनावट किडनी प्रत्यारोपणाची पाच प्रकरणं उजेडात आली आहेत. अभिजीत गटणे आणि रवींद्र रोडगे या दोन एजंट्सचा पर्दाफाश झालाय.
पुणे : पुण्यातील (Pune News) प्रसिद्ध रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये (Ruby Hall Clinic) काही दिवसांपूर्वी किडनी रॅकेटचा (Kidney Racket) प्रकार उघडकीस आला होता. आता रुबी हॉस्पिटलमध्ये बनावट किडनी प्रत्यारोपणाची पाच प्रकरणं उजेडात आली आहेत. अभिजीत गटणे आणि रवींद्र रोडगे या दोन एजंट्सचा पर्दाफाश झालाय. या दोघांनी बनावट ग्राहक तयार करुन किडनी प्रत्यारोपण केल्याचं समोर आलंय.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या दोघांनी आठ ते नऊ बनावट किडनी प्रत्यारोपण केल्याचं समोर आलंय. पोलीस सध्या बनावट ग्राहकांचा शोध घेतायत. दरम्यान या सर्व प्रकरणी रुबी हॉल हॉस्पिटलची भूमिका आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पुण्यातील वानवडी भागातील इनामदार हॉस्पिटल बरोबर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचा समावेश आहे त्याचबरोबर कोइंबतूरच्या एका हॉस्पिटलमध्ये यातील एजन्टनी किडनी पुरवल्याचं दिसून आलंय. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे सारिका सुतार नावाच्या महिलेला 15 लाख रुपयांचं अमिश दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे तिची किडनी काढल्याचं समोर आल्यावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपस सुरु केला होता .
पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. सारिका सुतार या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने याआधी कारवाई करत रूबी हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता. फसवणूक आणि मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संबंधित बातम्या :