Pune News: पबकडून कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप, पुण्यातील पबने सेलिब्रेशनच्या नावाखाली टोक गाठलं!
Pune News: पोलिसांनी सदर प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा नोंद केले आहेत.
Pune News: नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत.
तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा नोंद केले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे. मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
देशभरात नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित अनेक ठिकाणी पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात देखील नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत येणाऱ्यांना पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट वाटप करण्यात आले. सदर प्रकार समोर आल्यानंतर कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती-
"पुण्यातील मुंढवा येथील हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे," असे या पत्रात लिहले आहे. अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे, असं सुद्धा या पत्रात नमूद आहे.
पुण्यात शिक्षिकेकडून 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार-
पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. महिला शिक्षिकेने 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील गंज पेठेतील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दर प्रकरणी महिला शिक्षकेला पोलिसांनी अटक केली असून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुण्यातील गंज पेठेत असणाऱ्या एका शाळेच्या आवारात शुक्रवारी उघडकीस आला. पीडित मुलगा हा भवानी पेठ परिसरात राहत असून तो इयत्ता दहावीत आहे. बोर्डाची परीक्षा होण्यापूर्वी शाळेत सुरू असलेल्या प्रिलियम परीक्षेसाठी तो शुक्रवारी शाळेत आला.
संबंधित बातमी:
Pune Crime News: पुण्यात शिक्षिकेकडून 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शाळेच्या आवारातच...