(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : धक्कादायक! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
Pune news : पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक एक घटना समोर आली आहे. पुण्यातील वडगावशेरीत ही घटना घडली आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. पूजा राठोड असं विद्यार्थिनीचे नाव असून ती 25 वर्षांची होती. पुण्यातील वडगाव शेरी येथील स्टडी सेंटर या अभ्यासिकेत अभ्यास करत होती. तिच्या अचानक जाण्याने सगळीकडे व्यक्त हळहळ व्यक्त केली जात आहे
नेमकं काय घडलं?
पूजा नेहमीप्रमाणे सगळं काम आटपून वडगावशेरीमधील श्री स्टडी सेंटर या अभ्यासिकेत गेली. अभ्यासाला सुरुवात करत होती त्यावेळी अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला झटका आल्यावर ती खाली कोसळली. हे बघून अभ्यासिकेत गोंधळ झाला. कोसळल्यावर तिला लगेच तिच्या मित्रमंडळींनी दवाखान्यात दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत ठरवलं.
सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
पुण्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेत सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. श्री स्टडी सेंटर मध्ये सुद्धा सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यावरून तिला हृदय विकाराचा झटका कसा आला हे स्पष्ट झालं.
पूजा ही मूळची सोलापूर जिल्ह्याची आहे. कोंडी तांडा हे तिचं गाव आहे. बीएससी केल्यानंतर ती पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात आली होती. शिक्षण झाल्यावर ती टीसीएस कंपनीत कामाला होती. नोकरी करत असताना ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील करत होती. पूजाला आई-वडील एक लहान बहिण आणि भाऊ आहे तिच्या अचानक जाण्याने राठोड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.