एक्स्प्लोर

Pune News : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांकडून सामानाची बांधाबांध, पुण्यात किती पाकिस्तानी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Pune News : पाकिस्तानी नागरिकांना परत आपल्या देशात जाण्याच्या सूचना देखील प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. तसेच आमच्याकडे संपूर्ण डेटा समोर आलेला नसून हा आकडा वाढण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

पुणे: जम्मू कश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात राज्यातील सहा पर्यटकांचे मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी(ता.22) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात येतात. या घटनेनंतर भारताने कडक पावले उचलत पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसा कायमचा बंद केला आहे. 

त्याचबरोबर जे पाकिस्तानी नागरिक सध्या भारतात आहेत. त्यांना देखील भारत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच भारताने अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अटारी-वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.

दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, पासपोर्ट डिपार्टमेंट तसेच व्हिसा देणाऱ्या लोकांकडून माहिती घेतली जात आहे. आत्तापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यात 111 जण पाकिस्तान देशाचे असून केंद्र शासनाकडून ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या दिवसात त्यांना परत आपल्या देशात जाण्याच्या सूचना देखील प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. तसेच आमच्याकडे संपूर्ण डेटा समोर आलेला नसून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यात वेगवेगळया प्रकारचे व्हिसा घेतलेले लोक असून केंद्राच्या सूचनेनुसार त्यांना त्यांच्या देशात परत जाण्याच्या सूचना देण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक हे वास्तव्यास असून तीन पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडला आहे. शहरात सध्या 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून त्यापैकी 91 जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत. यात 35 पुरुष तर 56 महिला आहेत. यात बहुसंख्येने दीर्घ मुदतीचा व्हिसा घेतलेले आहेत. हा व्हिसा पाच वर्षांसाठी वैध असतो तर व्हिजिटर व्हिसा 90 दिवसांचा असतो. पण पहेलगाम येथे झालेल्या घटनेनंतर केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार या लोकांना त्यांच्या देशात परत जावं लागणार आहे आणि तशी अंमलबजावणी देखील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या भागामध्ये झालेल्या पर्यटकांवरीव हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सीसीएस म्हणजेच कॅबिनेट सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित उपस्थित होते. बैठक तीन तास सुरु होती. या बैठकीनंतर पररराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सीसीएसच्या बैठकीत पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Armed robbery at State Bank: स्टेट बँकेच्या 21 कोटींच्या सशस्त्र दरोड्यात मंगळवेढ्याचं नवीन कनेक्शन! कार सुद्धा सापडली, राजकीय सूत्रधार असल्याची चर्चा
स्टेट बँकेच्या 21 कोटींच्या सशस्त्र दरोड्यात मंगळवेढ्याचं नवीन कनेक्शन! कार सुद्धा सापडली, राजकीय सूत्रधार असल्याची चर्चा
India vs Oman: टीम इंडिया जिंकली, पण पहिल्यांदाच भिडत कॅप्टनसह भारतीयांचा भरणा असलेल्या ओमाननं शेवटपर्यंत झुंजवलं, हार्दिक पांड्यासोबत खेळलेला क्रिकेटरही ओमान संघात!
टीम इंडिया जिंकली, पण पहिल्यांदाच भिडत कॅप्टनसह भारतीयांचा भरणा असलेल्या ओमाननं शेवटपर्यंत झुंजवलं, हार्दिक पांड्यासोबत खेळलेला क्रिकेटरही ओमान संघात!
Nashik Crime : अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, कॉलर पकडून एकाला चोपलं, नाशिकमध्ये झिंगाट तरुणींचा धिंगाणा
अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, कॉलर पकडून एकाला चोपलं, नाशिकमध्ये झिंगाट तरुणींचा धिंगाणा
Bullet Train Shilphata to Ghansoli Tunnel: बुलेट ट्रेनचा प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण, पाच किलोमीटर लांब शीळफाटा ते घणसोली बोगदा पूर्ण,  एकाचवेळी धावणार दोन गाड्या
बुलेट ट्रेनचा प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण, पाच किलोमीटर लांब शीळफाटा ते घणसोली बोगदा पूर्ण, एकाचवेळी धावणार दोन गाड्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Armed robbery at State Bank: स्टेट बँकेच्या 21 कोटींच्या सशस्त्र दरोड्यात मंगळवेढ्याचं नवीन कनेक्शन! कार सुद्धा सापडली, राजकीय सूत्रधार असल्याची चर्चा
स्टेट बँकेच्या 21 कोटींच्या सशस्त्र दरोड्यात मंगळवेढ्याचं नवीन कनेक्शन! कार सुद्धा सापडली, राजकीय सूत्रधार असल्याची चर्चा
India vs Oman: टीम इंडिया जिंकली, पण पहिल्यांदाच भिडत कॅप्टनसह भारतीयांचा भरणा असलेल्या ओमाननं शेवटपर्यंत झुंजवलं, हार्दिक पांड्यासोबत खेळलेला क्रिकेटरही ओमान संघात!
टीम इंडिया जिंकली, पण पहिल्यांदाच भिडत कॅप्टनसह भारतीयांचा भरणा असलेल्या ओमाननं शेवटपर्यंत झुंजवलं, हार्दिक पांड्यासोबत खेळलेला क्रिकेटरही ओमान संघात!
Nashik Crime : अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, कॉलर पकडून एकाला चोपलं, नाशिकमध्ये झिंगाट तरुणींचा धिंगाणा
अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, कॉलर पकडून एकाला चोपलं, नाशिकमध्ये झिंगाट तरुणींचा धिंगाणा
Bullet Train Shilphata to Ghansoli Tunnel: बुलेट ट्रेनचा प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण, पाच किलोमीटर लांब शीळफाटा ते घणसोली बोगदा पूर्ण,  एकाचवेळी धावणार दोन गाड्या
बुलेट ट्रेनचा प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण, पाच किलोमीटर लांब शीळफाटा ते घणसोली बोगदा पूर्ण, एकाचवेळी धावणार दोन गाड्या
iPhone 17 Price India: दोन लाखांच्या आयफोनपेक्षा दुभत्या गायी, म्हशी बऱ्या; खरी गुंतवणूक तीच जी उत्पन्न देते! गोकुळ अध्यक्ष नाविद मुश्रीफांच्या व्हायरल पोस्टची चांगली चर्चा
दोन लाखांच्या आयफोनपेक्षा दुभत्या गायी, म्हशी बऱ्या; खरी गुंतवणूक तीच जी उत्पन्न देते! गोकुळ अध्यक्ष नाविद मुश्रीफांच्या व्हायरल पोस्टची चांगली चर्चा
Singer Zubeen Garg Death: लाईफ जॅकेटशिवाय स्कूबासाठी पाण्यात उतरला, काही सेकंदातच खेळ खल्लास; समुद्रात तरंगताना आढळला गायक जुबिन गर्गचा मृतदेह
लाईफ जॅकेटशिवाय स्कूबासाठी पाण्यात उतरला, काही सेकंदातच खेळ खल्लास; समुद्रात तरंगताना आढळला गायक जुबिन गर्गचा मृतदेह
Satara Crime: नव्याकोऱ्या मोबाईल फोनचा कॅमेरा बिघडला, साताऱ्याचा तरुण दुकानात गेला अन् वादात जीव गमावला
पायातील चप्पलीने दुकानाची फरशी घाण झाली, दुकानदाराची ग्राहकाशी झटापट, साताऱ्यात तरुणाचा मृत्यू
Solapur Crime News: दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या सोबत भिडला; वादात शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्त्याचा बळी, महिला गंभीर जखमी
दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या सोबत भिडला; वादात शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्त्याचा बळी, महिला गंभीर जखमी
Embed widget