Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर? पिंपरी चिंचवडमधील नाट्य संमेलनाचं निमित्त
Pimpari News : पिंपरी चिंचवडमधील नाट्य संमेलनात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजच्या पिंपरीतील उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार असल्याचं कळवलं आहे.
पिंपरी-चिंचवड, पुणे : पुण्यातील नाट्य संमेलनात राजकीय नाट्याचा पहिला अंक झाला. आज पिंपरी चिंचवड शाखेच्या नाट्य संमेलनात राजकीय नाट्याचं दुसरा अंक पाहायला मिळू शकतो. कालच्या पुण्यातील नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाचे आमंत्रणचं मिळाले नव्हते, असं म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजच्या पिंपरीतील उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार असल्याचं कळवलं आहे. या नाट्यपरिषदेच्य़ा मंचावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकत्र येणार आहे. यावेळी दोघंही एकमेकांवर टीका करतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर?
काल पुण्यातील नाट्य संमेलनाला ऐनवेळी अनुपस्थित राहिलेले शरद पवार ही आज पिंपरीतल्या नाट्य संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळं आज तरी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसतील. पुण्यात काल जे नाट्य घडलं ते आज पिंपरीत घडणार नाही, अशी अपेक्षा आहे. असं घडल्यास शरद पवार आणि अजित पवारांच्या हालचालींसह ते काय म्हणतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावतील.
राजकीय मंच नाही तर सांस्कृतिक मंचावर एकत्र
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार हे शरद पवारांना सातत्त्याने टीका करताना दिसतात. त्यामुळे शरद पवार हे अजित पवारांसोबत मंचावर एकत्र येण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. यापूर्वी दिवाळीत दौंडमध्येदेखील दोघे एकत्र येणार होते. मात्र काही कारणं देत मंचावर एकत्र येण्यास टाळाटाळ केली होती. मात्र या नाट्य संमेलनाच्या मंचावर येणार असून हा राजकीय मंच नसून ही राज्याचा सांस्कृतिक मंच आहे. त्यामुळे या मंचावर येण्यास काहीही हरकत नाही. मात्र हे सगळं असलं तरीही दोघे एकत्र येणार असल्याने त्यांच्या हालचालींवर राज्याच्या सांस्कृतिक आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. दोघेही एकमेकांवर काही भाष्य करतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शोभा यात्रेला सुरुवात
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पिंपरी चिंचवडमधल्या शोभा यात्रेला सुरुवात झालेली आहे. यंदा 100 वे वर्ष असल्याने भव्य नाट्य दिंडी आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक कलाकार यात सहभागी झाले आहेत. संजय मोने, वैभव मांगले, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव अशा अनेक कलाकारांनी आवर्जून उपस्थिती लावली आहे. रंगमंचावर मोठं योगदान असलेले अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. तर अनेक पारंपरिक आणि विविध कलांचे सादरीकरण करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एक भव्य सोहळा या 100 व्या वर्षानिमित्त आपल्याला बघायला मिळतोय.
महत्वाच्या इतर बातम्या :