एक्स्प्लोर

Pune New Year : वेलकम 2023! 31 डिसेंबरला पुण्यात तीन हजार पोलीस तैनात; गडकिल्ल्यांवरही बंदी

Pune New Year : पुण्यात सगळीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी सुरु झाली आहे. 31 डिसेंबरला रात्री सुमारे तीन हजार पोलीस तैनात असणार आहेत. त्यामुळे सगळीकडे पोलिसांची करडी नजर असणार आहे. 

Pune New Year : पुण्यात सगळीकडे (Pune) नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी सुरु झाली आहे. यंदा दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात नववर्ष साजरं होणार आहे. याच उत्साहाला गालबोट लागू नये म्हणून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी (pune police) नियोजन सुरु केलं. 31 डिसेंबरला रात्री सुमारे तीन हजार पोलीस तैनात असणार आहेत. त्यामुळे सगळीकडे पोलिसांची करडी नजर असणार आहे. 

31 डिसेंबरला अनेक तरुण नववर्ष साजरं करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. विविध रेस्टॉरंट आणि खासगी रिसॉर्टमध्ये अनेकांनी पार्टी आणि सेलिब्रेशनचं नियोजन केलं आहे. याशिवाय पुण्यातील अनेक रस्त्यांवर तरुणाई गर्दी करते. यंदा 31 साजरा करण्यासाठी मोठी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे. शहरात 'ड्रंक अँड ड्राइव्ह' विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याने तरुणांना गाडी चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे.

प्रमुख मार्गांवर नाकाबंदी 'थर्टी फस्ट'च्या रात्री विविध भागांतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात येणार आहे. नागरिकांना आक्षेपार्ह घटना अथवा काही संशय असल्यास 26126296, 8975953100  किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी केले आहे. 

गडकिल्ल्यांवर बंदी

नवीन वर्ष साजरं करण्यासाठी अनेक अतिउत्साही पुण्यातील सर्व टेकड्या आणि किल्ल्यांवर गर्दी करतात. रात्रीदेखील मुक्काम ठोकतात. त्यामुळे या अतिउत्साही लोकांना आळा घालण्यासाठी वनक्षेत्राच्या परिसरात आणि गडकिल्ल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत. 

फर्ग्युसन रोड आणि महात्मा गांधी रोड बंद

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (एफसी रोड) आणि महात्मा गांधी रस्ता (एमजी रोड) वाहनांसाठी बंद राहणार आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री गर्दीचा आढावा घेऊन वाहनांसाठी हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. एफसी रोड आणि एमजी रोड या दोन्ही रस्त्यांवर 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात तरुणाई एकत्र येते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. यामुळे हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. 

वाहतुकीत बदल

- महात्मा गांधी रस्त्यावरील वाहतूक 15 ऑगस्ट चौकातून कुरेशी मशीदमार्गे वळवण्यात येणार आहे. 
- इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवरकडे जाता येणार नाही आहे.
- व्होल्गा चौकातून महंमद रफी चौककडे वाहतूक बंद असणार आहे.
- इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद असणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut PC :  गांधींनी मोदींना लोकसभेत घाम फोडला मला बोलू दिलं नाही, माईक बंद केला- राऊतNutritious Food Pregnant Women : गर्भवती माता पोषण आहारात साप; सखोल चौकशीची मागणी9 Second News : 9 सेकंदात बातमी राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Embed widget