एक्स्प्लोर

राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर अखेर पोलिसांना शरण

या प्रकरणी पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर अखेर पुणे पोलिसांना शरण आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळताना दहा दिवसांच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत. त्यानुसार दीपक मानकर आज पोलिसांसमोर हजर झाले. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीपक मानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र जगताप हे अनेक वर्ष दीपक मानकर यांच्याकडे काम करत होते. त्यांनी 2 जून रोजी आत्महत्या केली होती. जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात दीपक मानकर यांचं नाव चर्चेत आलं होतं. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं.या पाच जणांत दीपक मानकर यांच्याही नावाचा समावेश आहे. या प्रकरणी पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर दीपक मानकर फरार झाले होते. अटक टाळण्यासाठी त्यांनी सुरुवातीला पुणे सत्र न्यायालय, मग मुंबई उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळल्याने पोलिसांना शरण जाण्याशिवाय त्यांच्याकडे  पर्याय नव्हता. कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मानकरचं नाव मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने 2 जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. रास्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला. जितेंद्र जगताप हा गेली अनेक वर्ष दीपक मानकरांचे जमिनीचे व्यवहार पाहात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून समर्थ पोलिस स्टेशनसमोर असलेल्या जागेवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यासाठी मानकर, कर्नाटकी, भोळे यांच्या अनेकवेळा बैठकाही झाल्या होत्या. जागेचा ताबा सोडण्यासाठी मानकर जितेंद्र जगतापवर दबाव टाकत होते. दरम्यान जितेंद्र जगताप हा खंडणी उकळण्यासाठी आत्महत्येची धमकी देत होता आणि त्याबद्दलचा अर्ज आपण 1 जूनलाच पोलिस आयुक्तालयात दिल्याचं म्हटलं आहे. दीपक मानकर यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. काँग्रेसमध्ये असताना नातू वाड्यातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अटक झाली होती. अनेक दिवस येरवडा कारागृहात जावं लागलं होतं. संबंधित बातम्या :  दीपक मानकर यांना अटक निश्चित, सुप्रीम कोर्टानेही जामीन नाकारला दीपक मानकरांना हायकोर्टाचा पुन्हा झटका  दीपक मानकरांच्या याचिकेवर सुनावणीस दुसऱ्या खंडपीठाचाही नकार  दीपक मानकर 'आऊट ऑफ कव्हरेज'!  पुण्यातील नगरसेवक दिपक मानकर अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात जितेंद्र जगतापच्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकरांचं नाव पुणे : जितेंद्र जगताप यांचा लहान भाऊ आणि मुलासोबत बातचीत 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावसाने दडी मारली, मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या वैतरणा जलाशयात किती पाणी?
पावसाने दडी मारली, मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या वैतरणा जलाशयात किती पाणी?
MS dhoni: चाळीसी ओलांडेलेला धोनी किती वर्षाचा झाला? माहीने साधेपणाने साजरा केला 'हॅप्पी बर्थ डे'
Video : चाळीसी ओलांडेलेला धोनी किती वर्षाचा झाला? माहीने साधेपणाने साजरा केला 'हॅप्पी बर्थ डे'
Rupali Thombre : Nishikant Dubey कुत्र्‍यासारखा,आपटून मारु; अजितदादांच्या वाघीणीचा थेट इशारा
Rupali Thombre : Nishikant Dubey कुत्र्‍यासारखा,आपटून मारु; अजितदादांच्या वाघीणीचा थेट इशारा
Sindhudurg Accident : रिक्षाची झाडाला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील सहा जण जखमी, पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश
रिक्षाची झाडाला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील सहा जण जखमी, पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rupali Thombre : Nishikant Dubey कुत्र्‍यासारखा,आपटून मारु; अजितदादांच्या वाघीणीचा थेट इशारा
Jitendra Awhad : ट्रॅपमध्ये अडकू नका,मराठी माणसाला उकसवतायत;दुबेंवरुन आव्हाडांची टीका
Bachchu Kadu Amravati : बच्चू कडूंची कर्जमाफीसाठी 'सातबारा कोरा'पदयात्रा
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 07 जुलै 2025
Rohit Pawar On Ashish Shelar | मराठी माणसाची दहशतवाद्यांशी तुलना, राजकारण तापले!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसाने दडी मारली, मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या वैतरणा जलाशयात किती पाणी?
पावसाने दडी मारली, मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या वैतरणा जलाशयात किती पाणी?
MS dhoni: चाळीसी ओलांडेलेला धोनी किती वर्षाचा झाला? माहीने साधेपणाने साजरा केला 'हॅप्पी बर्थ डे'
Video : चाळीसी ओलांडेलेला धोनी किती वर्षाचा झाला? माहीने साधेपणाने साजरा केला 'हॅप्पी बर्थ डे'
Rupali Thombre : Nishikant Dubey कुत्र्‍यासारखा,आपटून मारु; अजितदादांच्या वाघीणीचा थेट इशारा
Rupali Thombre : Nishikant Dubey कुत्र्‍यासारखा,आपटून मारु; अजितदादांच्या वाघीणीचा थेट इशारा
Sindhudurg Accident : रिक्षाची झाडाला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील सहा जण जखमी, पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश
रिक्षाची झाडाला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील सहा जण जखमी, पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश
लिंबू, काळा कपडा ते महिलांचे फोटो, भिवंडीतील स्मशानभूमीत अघोरी पूजा, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
लिंबू, काळा कपडा ते महिलांचे फोटो, भिवंडीतील स्मशानभूमीत अघोरी पूजा, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
मी तुला विकत घेऊ शकतो, अर्धनग्न अवस्थेत तरुणाची राजश्री मोरेला शिवीगाळ; आता, मनसेकडून पत्रक
मी तुला विकत घेऊ शकतो, अर्धनग्न अवस्थेत तरुणाची राजश्री मोरेला शिवीगाळ; आता, मनसेकडून पत्रक
मोठी बातमी ! महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचा बिगुल; निवडणूक आयोगाने बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
मोठी बातमी ! महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचा बिगुल; निवडणूक आयोगाने बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
डेटिंग अ‍ॅपवरुन हॉटेलात बोलवायचे, ड्रिंक्सचं बिल 15 हजार करायचे; 6 महिलांसह 22 जणांच्या टोळीला बेड्या
डेटिंग अ‍ॅपवरुन हॉटेलात बोलवायचे, ड्रिंक्सचं बिल 15 हजार करायचे; 6 महिलांसह 22 जणांच्या टोळीला बेड्या
Embed widget