एक्स्प्लोर

Pune : पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईत नागरिक आक्रमक, आत्मदहनाचा प्रयत्न

Pune : या कारवाई दरम्यान पोलीस आणि नागरिकांच्यामध्ये झटापट झाल्याचं दिसून येतंय. पुण्यातील आंबिल-ओढा परिसरातील या 100 गुंठ्यांच्या या प्लॉटवर शहरातील अनेक बिल्डर्सची नजर असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पुणे : आंबिल-ओढा झोपडपट्टी परिसरात महापालिकेच्या वतीनं अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्याविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला आहे. काही नागरिकांनी यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. 

पावसाळा सुरु असताना महापालिकेने जेसीबीच्या मदतीने हे अतिक्रमण सुरु केल्यानं स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. पाच ते सहा जेसीबींच्या सहाय्याने ही कारवाई करण्यता येत असून या भागातील घरांतून नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढलं आहे. 

मालकी महापालिकेची आणि नोटिस बिल्डरची
आंबिल ओढा परिसरातील हा प्लॉट पुणे महापालिकेच्या मालकीचा असून इथल्या रहिवाशांना केदार बिल्डर्सकडून अतिक्रमणाची नोटिस पाठवल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ही महापालिकेची जागा असली तरी महापालिकेकडून कोणतीही नोटिस आली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं. या संदर्भात बुधवारी महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत अशा प्रकारची  कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असं आयुक्तांनी आश्वासन दिलं असतानाही आज सकाळी ही कारवाई सुरु झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 

आंबिल ओढा परिसरातील या 100 गुंठ्याच्या प्लॉटवर शहरातील अनेक बिल्डर्संची नजर असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या वतीनं कोणतीही नोटिस आली नसल्याने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. या परिसरातील लोक गेली पन्नास वर्षे इथं राहत असून त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रयत्न  न करता महापालिका ही कारवाई केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे.

ही कारवाई अचानक करण्यात आली नसून पूराची परिस्थिती लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे. फक्त या लोकांचे पर्यायी पुनर्वसन केलं जायला हवं असं पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण भाजपच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण भाजपच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget