Pune PMC Commissioner : राजेंद्र भोसले यांची पुणे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती!
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच राज्यात मोठ्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने राजेंद्र भोसले यांची पुण्याचे नवे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे
पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच राज्यात मोठ्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने राजेंद्र भोसले यांची पुण्याचे नवे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. ते 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी भोसले हे मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी होते. यापूर्वी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर व अहमदनगरचे जिल्हाधिकारी अशी पदे त्यांनी भूषविली आहेत.
दरम्यान, यापूर्वी विक्रम कुमार हे पुणे महापालिका आयुक्त होते. त्यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. 2004 च्या बॅचचे आयएएस अधिकारी कुमार यांची जुलै 2020 मध्ये पीएमसी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि नंतर 15 मार्च 2022 रोजी ते प्रशासक बनले .यापूर्वी त्यांची नियुक्ती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त होती.गेल्या दोन वर्षांत मी चोवीसतास पाणी योजना, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या मदतीने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अशा शहरातील बहुतांश मोठ्या प्रकल्पांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला.निवडून आलेले सदस्य नसतानाही प्रशासन म्हणून आम्ही शहराला न्याय देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले, असंही त्यांनी सांगितलं.
प्रशासकराजला दोन वर्ष पूर्ण अन् त्याच दिवशी...
विक्रम कुमार यांना प्रशासक म्हणून दोन वर्ष पूर्ण झाले होते. पुणे महापालिकेच्या इतिहास आतापर्यंत प्रथमच 2022 प्रशासकराज आहे. तेव्हापासून ते एकहाती महापालिकेचा कारभार बघत होते. या प्रशासकराजला 15 मार्चला दोन वर्ष पूर्ण झाले आणि त्याच दिवशी त्यांची बदली करण्यात आली.
याशिवाय लहू माळी (आयएएस: एमएच: 2009 ) यांच्याकडे मंत्रालय, मुंबई येथील मदत व पुनर्वसन विभागात आपत्ती व्यवस्थापन संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आपत्ती पूर्वतयारी यंत्रणा बळकट करण्यावर सरकारचा भर असल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच कैलास पगारे (आयएएस: एमएच: 2010) यांची नवी मुंबईतील एकात्मिक आदिवासी विकास योजनेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, या भागातील आदिवासी समाजासाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्याची सरकारची बांधिलकी दिसून येते. हे बदल संपूर्ण महाराष्ट्रात विकास आणि प्रभावी कारभाराला चालना देण्याच्या उद्देशाने प्रशासकीय भूमिकांची धोरणात्मक पुनर्रचना दर्शवितात.
इतर महत्वाची बातमी-
-Pune MNS : कात्रज मनसेचा बालेकिल्ला आहे, होता आणि राहिल; मनसेच्या बॅनरची जोरदार चर्चा