एक्स्प्लोर

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सीएसएमटीवरील विशेष पॉवर ब्लॉक, प्रगती, डेक्कनसह 'या' ट्रेन्स रद्द, वाचा Timetable

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यावरून मुंबईला जाणारी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे. 

Pune-Mumbai trains : पुण्याहून मुंबईला (Pune- Mumbai Train)  कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. रोज हजारो पुणेकर मुंबईला रेल्वेने जात असतात. पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि  11 च्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.   त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यावरून मुंबईला जाणारी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म  क्रमांक 10 व 11 च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून  विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल आणि मेल- एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान भायखळा ते सीएसएमटीदरम्यान  घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आली आहे.   ट्रेन 28 ते 31 मेदरम्यान  अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

कोणत्या ट्रेन रद्द?

  • सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस  (28 मे ते 2 जून) 
  •  पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस (31 मे ते 2 जून)
  •  नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस ( 1 आणि 2 जून)
  •  साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस (1 आणि 2 जून) 
  • डेक्कन क्वीन (1 आणि 2 जून) 

 या गाड्या रद्द असणार आहेत. विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमध्ये मुंबई-पुणे इंटरसिटी, प्रगती एक्स्प्रेस चार दिवस रद्द राहणार आहे. 

काही गाड्या पनवेल, ठाणे स्थानकात रद्द

अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणेपर्यंत चालविण्यात येणार आहे; तर मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच चालविण्यात येणार आहे.

दादरहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या

सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस, सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस, सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या दादर; तर सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेलमधून सुटणार आहे.

‘डेक्कन क्वीन’ चा वाढदिवस रद्द

डेक्कन क्वीनचा वाढदिवस दर वर्षी एक जूनला साजरा केला जातो. मुंबई- पुणे प्रवास करणारे प्रवासी मोठ्या उत्साहाच वाढदिवस साजरा करतात.  पण यंदा  1 आणि 2  जूनला ‘डेक्कन क्वीन’ रद्द  करण्यात आली आहे.  ‘डेक्कन क्वीन’चा 97 वा वाढदिवस होणार होता; परंतु गाडी रद्द केल्याने यंदाचा वाढदिवस हुकण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा :

 भाविकांनो कृपया इथे लक्ष द्या! भारतीय रेल्वे घडवणार 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन, 1 जूनला धावणार 'भारत गौरव' स्पेशल ट्रेन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
Embed widget