Travel : भाविकांनो कृपया इथे लक्ष द्या! भारतीय रेल्वे घडवणार 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन, 1 जूनला धावणार 'भारत गौरव' स्पेशल ट्रेन
Travel : भारतीय रेल्वेच्या अंतर्गत IRCTC ने भाविकांसाठी खास भारत गौरव विशेष ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. यामध्ये सात ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविण्यात येणार आहेत.
Travel : भाविकांनो कृपया इथे लक्ष द्या! जर तुम्हालाही कमी बजेटमध्ये धार्मिक स्थळांच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर भारतीय रेल्वे तुम्हाला खास पॅकेजची संधी देत आहे. भारतीय रेल्वेच्या टूर पॅकेजच्या माध्यमातून विविध ठिकाणी फिरण्याची संधी दिली आहे. पण जर का तुम्ही भगवान भोलेनाथाचे भक्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. भारतीय रेल्वेच्या अंतर्गत IRCTC ने भाविकांसाठी खास भारत गौरव विशेष ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. या पॅकेज अंतर्गत सोमनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग या सात ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविण्यात येणार आहेत.
1 जूनला धावणार 'भारत गौरव' स्पेशल ट्रेन!
भारतीय रेल्वेचा हा दौरा राजस्थानातील जयपूर येथून सुरू होणार आहे.
तर भारत गौरव ट्रेन 1 जून 2024 रोजी जयपूर येथून 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी सुरूवात करणार आहे.
हे पॅकेज 10 रात्री आणि 11 दिवसांसाठी असेल.
जयपूर रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त, प्रवासी अजमेर, भिलवाडा, चित्तोडगड आणि उदयपूर स्थानकांवरून चढू अगर उतरू शकतील.
Explore the Divine Wonders! Join Bharat Gaurav Train's 7 Jyotirlinga Yatra from Yog Nagari Rishikesh. Traverse through sacred destinations like Dwarkadhish, Somnath, and more.
— IRCTC Bharat Gaurav Tourist Train (@IR_BharatGaurav) April 24, 2024
Book now : https://t.co/C9qFqQiYdx@maha_tourism @GujaratTourism @MPTourism #DekhoApnaDesh #Travel pic.twitter.com/WJP8XsAHtA
कुठे जाणार?
गुजरात : सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर
द्वारका: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि द्वारकाधीश मंदिर
पुणे : भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर
नाशिक : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
औरंगाबाद : घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
उज्जैन: महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
पॅकेजची किंमत किती?
IRCTC च्या या टूर पॅकेजचे दर प्रवाशाने निवडलेल्या पर्यायानुसार असतील. हे पॅकेज 26,630 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. कंफर्ट क्लासमध्ये डबल/ट्रिपल ऑक्यूपेंसीसाठी प्रति व्यक्ती खर्च रु. 26,630 आहे. तर स्टॅंडर्ड वर्गात, डबल/ट्रिपल ऑक्यूपेंसीसाठी प्रति व्यक्ती खर्च 31,500 रुपये आहे.
कसे बुक करायचे?
IRCTC वेबसाइट irctctourism.com ला भेट देऊन तुम्ही या टूर पॅकेजसाठी ऑनलाइन बुकिंग करू शकतात. पॅकेजशी संबंधित माहितीसाठी, तुम्ही 8595930996/ 8595930998/ 8595930997/ 9001094705 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
हेही वाचा>>>
Travel : पृथ्वीवरील स्वर्ग 'काश्मीर' ला उगाच नाही म्हणत..! भारतीय रेल्वेकडून जूनमध्ये फिरण्याची उत्तम संधी, जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )