एक्स्प्लोर

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! पावसामुळे कोणत्या एक्स्प्रेस गाड्या रद्द, जाणून घ्या अपडेट

Pune-Mumbai Train Cancelled : डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस सुद्धा आज धावणार नाहीत. याशिवाय सोलापूर-पुणे मार्गे मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेसही बंद करण्यात आली आहे.

पुणे : मुंबई आणि पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाचा फटका बसत असून याचा थेट परिणाम रेल्वे सेवांवर झाला आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. सकाळी पुणेहून मुंबईकडे धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस या तिन्ही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. दुपारच्या सत्रात धावणारी डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस सुद्धा आज धावणार नाहीत. याशिवाय सोलापूर-पुणे मार्गे मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेसही बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या. सततच्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल करावा लागत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून अनेकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. रेल्वे प्रशासनाकडून हवामान लक्षात घेऊन पुढील काही दिवस गाड्यांबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे. प्रवाशांनी नियोजित प्रवासापूर्वी रेल्वेची अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पावसामुळे पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे आज रद्द

सिंहगड एक्सप्रेस सह डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आली आहे. पुण्यातून या तीन रेल्वे दररोज मुंबईसाठी धावतात. दुपारच्या सत्रातील डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस सुद्धा आज रद्द केली आहे. सोलापूर ते पुणे मार्गे मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आज धावणार नाही. काल मुंबईहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या सुद्धा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुंबईतील मुसळधार पावसामुळे या रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुण्याहून मुंबईसाठी आज कुठल्या ट्रेन रद्द, पाहूया

११०१०: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस 

११००७: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस 

१२१२८: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस 

२२१०६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस 

१२१२६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

१२१२४: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्विन

२२२२६: वंदे भारत एक्सप्रेस

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Smita Jadhav: तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget