Vasant More: चार महिन्यांनी वसंत मोरेंचा पक्ष कार्यालयात प्रवेश; स्थानिक नेत्यांशी पटत नसल्याने चार महिने कार्यालयापासून दूर
मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे चार महिन्यानंतर पक्ष कार्यालयात आले. पुण्यातील स्थानिक नेत्यांसोबत मोरेंच पटत नसल्याने पक्ष कार्यालयापासून ते दुर असतात.
Vasant More: मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे चार महिन्यानंतर पक्ष कार्यालयात आले. पुण्यातील स्थानिक नेत्यांसोबत मोरेंच पटत नसल्याने पक्ष कार्यालयापासून ते दुर असतात. मात्र आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली. यावेळी वसंत राज ठाकरेंच्या सोबत पक्ष कार्यालयात आले.
वसंत मोरेंकडे नुकतीच बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मनसेने बारामतीतुन उमेदवार उभे करायच ठरवलं आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी वसंत मोरेंनी कंबर कसली कसली आहे. बारामतीत नेमकं काम कसं करायचं? याचं ते नियोजन करत आहेत. बारामतील प्रचारादरम्यान राज ठाकरे यांना बोलवण्याचा मानस असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मनसेवर नाराज असल्याचं चित्र दिसत होतं. वसंत मोरे हे पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय भाग घेत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे आता वसंत मोरे यांना थेट सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्याा आदेशानुसार पुणे ग्रामीण- मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. किशोर शिंदे, हेमंत संभुस, गणेश सातपुते यांना मावळ लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. अजय शिंदे आणि बाळा शेडगे यांनी शिरूर लोकसभा तर वसंत मोरे, सुधीर पाटसकर आणि रणजित शिरोळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
का होते वसंत मोरे नाराज?
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाबाबत गुढीपाडव्याच्या सभेत भूमिका जाहीर केल्यानंतर निषेधाचा पहिला सूर उमटला होता. वसंत मोरे यांनी या भूमिकेला विरोध केला होता. त्यावेळी मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आपली अडचण होत असल्याचं म्हटलं होतं. वसंत मोरे यांच्या प्रभागात अनेक मुस्लिम बांधवांची वस्ती आहे. भोंगे बंद करुन त्यांच्या भावना दुखावणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर त्यांची मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टीही झाली होती. मनसेचे नेते साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र वसंत मोरेंची नाराजी स्पष्ट दिसत होती. त्यानंतर वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा दावा मनसेकडून करण्यात आला होता.