एक्स्प्लोर

Pune Metro : पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त ठरला; 'या' दिवशी सुरु होणार नवी मार्गिका

अखेर पुणे मेट्रोच्या नव्या मार्गीकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला आहे. 6 मार्च रोजी पुण्यातील नव्या मेट्रोमार्गाचे उद्घाटन होणार आहे.

पुणे : पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं  (Pune Metro)  काम पूर्ण होऊनही अनेक कारणांमुळे या मेट्रो मार्गाचं उद्घाटन रखडलं होतं. त्यातच सगळी मार्गिका तयार असूनही मेट्रो मार्ग का सुरु करत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर अखेर पुणे मेट्रोच्या नव्या मार्गीकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला आहे. 6 मार्च रोजी पुण्यातील नव्या मेट्रोमार्गाचे उद्घाटन होणार आहे.

पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गेकेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहे. नव्या 5.5 किलोमीटरच्या मार्गीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहे.  गेल्या अनेक दिवसापासून नवा मार्ग तयार होऊन देखील उद्घाटन अभावी मेट्रो धावू शकली नव्हती. पण पंतप्रधान कार्यालयाकडून 6 मार्चचा मुहूर्त मिळाल्याने कोलकत्ता येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन स्वरूपात करणार नव्या मेट्रोमार्गेचे उद्घाटन करणार आहे. 

रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गावरील सेवा अद्याप सुरू झालेली नाही. साडेपाच किलोमीटरच्या या मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणी नगर आणि रामवाडी अशी चार स्थानके आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये या मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मार्ग सुरू झाल्यानंतर पुणे मेट्रो 14 चे काम पूर्ण करेल, असं सांगण्यात आलं होतं.

उबाठा आक्रमक अन् मेट्रोचा मुहूर्त लागला...

मागील काही दिवसांपासून पुणे मेट्रो वेगवेगळ्या कारणावरुन चर्चेत आहे. पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचं काम पूर्ण होऊन त्याची ट्रायलदेखील पार पडली आहे. मात्र तरीही ही मार्गिका मेट्रो प्रशासनाकडून सुरु करण्यात येत नाही आहे. त्यात मध्यंतरी पुणे मेट्रोच्या या मार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. मात्र त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर लवकर ही मार्गिका सुरु होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सगळं काम तयार असूनही या मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनाला विलंब केला जात होता. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आक्रमक झाला होता आणि त्यांनी थेट मेट्रो कार्यलयाला घेराव घातला होता. 
 
मेट्रोची ट्रायल झाल्यावर काही बदल करायला सांगितले होतं. त्यावर मेट्रो प्रशासनाकडून काम सुरु करण्यात आलं होतं. हे काम झालं की लवकरच उद्घाटन करु, असं मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र येत्या 10 दिवसांत मेट्रो सुरु नाही केली तर तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून देण्यात आला  होता. मात्र त्यापूर्वीच मेट्रोने उद्घाटनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Sunetra Pawar Met Sangram Thopte : सुनेत्रा पवार कॉंग्रेस आमदार संग्राम थोपटेंच्या भेटीला; थोपटेंच्या वडिलांची केली विचारपूस, कारण ठरलं...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Embed widget