एक्स्प्लोर

Pune Metro News : प्रतिक्षा संपणार! पिंपरी ते स्वारगेट पुणे मेट्रो मार्ग मार्चमध्ये सुरू होणार

पिंपरी ते स्वारगेटपर्यंतच्या मेट्रोची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. मार्च 2024 पर्यंत पिंपरी ते स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरु होण्याची शक्यता मेट्रो प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे : पिंपरी ते स्वारगेटपर्यंतच्या मेट्रोची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. (Pune Metro) मार्च 2024 पर्यंत पिंपरी ते स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरु होण्याची शक्यता मेट्रो प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. पुणे मेट्रोने पहिल्या टप्प्यात PCMC आणि फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज या दरम्यान मेट्रो सुरु केली होती. 1 ऑगस्टपासून मेट्रोने आपली सेवा सिव्हिल कोर्टपर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणखी वाढली आहे. याचाच पुढचा टप्पा हा स्वारगेट असणार आहे. मार्च 2024 मध्ये या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. या मार्गामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना थेट मार्ग उपलब्ध होईल आणि प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेची बचत होईल.

वनाझ ते रामवाडी  मेट्रो मार्गाचे बांधकाम डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. ज्यामुळे पुणेकरांना थेट वनाझ ते रामवाडी असा प्रवास करता येणार आहे. यानंतर मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील कामाला गती मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही मेट्रो मार्गांचं काम जलद गतीने सुरू केले आहे. त्यात पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गांचा समावेश आहे. रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो स्टेशन आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्टेशन पर्यंतच्या उर्वरित लाईनचे बांधकाम वेगाने सुरू आहे. रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो स्टेशन डिसेंबर 2023 च्या अखेरीस प्रवाशांच्या सेवेसाठी खुले होईल. शिवाय सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशन मार्च 2024 च्या अखेरीस सुरू होईल, असं मेट्रो प्रशासनाने सांगितलं आहे. 

पिंपरी निगडी मार्गाला केंद्र सरकारकडून हिरवा झेंडा

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) इमारतीपासून निगडीपर्यंतच्या प्रस्तावित मार्गाला मंजुरी दिली आहे. काही दिवसांत केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय देखील मान्यता देईल असा अंदाज आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत या मार्गाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गाचा प्राथमिक प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्याचे महामेट्रोनं सांगितवं आहे. केंद्र सरकारने पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला हिरवा झेंडा दाखवला. याच आनंदोत्सव पिंपरी मनसे कडून करण्यात आला होता. निगडी येथील भक्ती शक्ती चौकात एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष करण्यात आला होता आमच्या मागणीला अखेर यश आल्याचा दावा यावेळी मनसेने केला होता.

इतर महत्वाची बातमी-

Lalit Patil drug Case : ललित पाटीलनं पळून जाण्याचा प्लॅन ससूनमध्येच आखला; सगळं ठरल्या प्रमाणं झालं अन्...; ललितचा पळून जाण्याचा घटनाक्रम आला समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget