(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गाजावाजा करुन उद्घाटन झालेल्या पुण्यातील मंडई मेट्रो स्थानकला भीषण आग
जवानांनी श्वसनरहीत अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारुन आग विझवली. जखमी कोणी नसून आग वेल्डिंगचे काम सुरु असताना लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे .
पुणे : महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रोस्थानकात रविवारी मध्यरात्री आग (Pune Mandai Fire) लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाचे पाच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्री 12 च्या सुमारास मंडईच्या मेट्रो स्टेशनला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल त्या ठिकाणी दाखल झाले. 26 सप्टेंबर रोजी या मेट्रोस्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं.
मध्यरात्री बाराच्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशन येथे तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाकडून तातडीने 5 वाहने रवाना करत आग पाचच मिनिटात आटोक्यात आणली. जवानांनी श्वसनरहीत अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारुन आग विझवली. जखमी कोणी नसून आग वेल्डिंगचे काम सुरु असताना लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे .
प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मेट्रो स्थानकाटे मोठे नुकसान झाले असले तरी रात्री आग लागल्याने प्रवाशांची वर्दळ नव्हती.त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मेट्रोचे काम अर्धवट असताना उद्घाटन केल्याने अशा घटना घडल्याने पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मंडई मेट्रो स्टेशनची आग नियंत्रणात, सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 20, 2024
मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.… pic.twitter.com/KxsEHOqQPo
आग नियंत्रणात, सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही
या संदर्भात खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील ट्वीट केले आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले, मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.सदरील घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालकश्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
हे ही वाचा :