(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Manache Ganpati : पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीचा क्रम कोणी आणि कधी ठरवला होता? जाणून घ्या गणपती विसर्जन मिरवणुकीचा इतिहास...
पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला देखील इतिहास आहे. जाणून घेऊयात पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासाबद्दल...
Pune Manache Ganpati : लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. गणेश चतुर्थीचा (Ganeshotsav 2023) उत्साह सगळीकडे बघायला मिळत आहेत. गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातील लोक पुण्यात (Pune)येतात. ढोल ताशाच्या गजरात गणपतीचं स्वागत केलं जातं. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती हे पुण्यातील मानाचे पाच गणपती आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाचा इतिहासबद्दल अनेकांना माहित असेल. पण पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीचा क्रम कोणी आणि कधी ठरवला? याबाबत अनेकांना माहित नसेल. पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला देखील इतिहास आहे. जाणून घेऊयात पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा इतिहास...
गेल्या वर्षी इतिहास आभ्यासक मंदार लवाटे यांनी एबीपी माझाला पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते, 'पेशवे काळामधील काही हे सासवड जवळ असणाऱ्या गराडे गावामध्ये आहेत. ते कागदपत्र मी पाहिले आहेत . त्यामध्ये असा उल्लेख आहे की, कोणत्या गणपतीचं विसर्जन कधी होणार. त्या कागदपत्रमध्ये हे देखील लिहिलं आहे की, गावातील पाटलांच्या गणपतीचं विसर्जन आधी व्हायचं. पेशवे काळात देखील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीची प्रथा होती.'
जेव्हा पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास सुरुवात झाली तेव्हा कोणत्या गणपतीचे विसर्जन हे आधी होईल? असा प्रश्न निर्माण झाला होता.
1894 मध्ये आधी कोणत्या मंडळाच्या गणपतीचं विसर्जन करायचं? यावरुन वाद निर्माण झाला होता. लोकमान्य टिळकांपर्यंत (Lokmanya Balgangadhar Tilak) हा वाद पोहचला आणि टिळकांनी मानाच्या गणपतींचा आणि विसर्जनाचा क्रम ठरवून दिला होता. पुण्याचा ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचं विसर्जन सर्वात आधी होईल त्यानंतर पुण्याची ग्रामदैवता असलेल्या तांबडी जोगेश्नवरी मंडळाचं विसर्जन होईल, असं टिकळांनी सांगितलं होतं.
1953 मधील एका पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की, पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक या विषयी कोतवाल चावडी बैठक चालू होती. तेव्हा वाद वाढेल असं वाटत होतं त्यामुळे ब्रह्मगिरी बुवा यांनी टिळकांची भेट घेऊन या विषयाबाबत सांगितलं. तेव्हा टिळकांनी गणपती मंडळाच्या गणपतींच्या विसर्जनाचा क्रम लावून दिला होता.
पाहा व्हिडीओ:
जवळपास 100 वर्षांपूर्वी पुण्यामध्ये टिळक पंचांग आणि दाते पंचांग यांच्यानुसार गणपतींची स्थापना करण्यात येत असे, असंही मंदार लवाटे यांनी सांगितलं होतं.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: