एक्स्प्लोर

पुण्यात आयटी इंजिनिअरच्या पतीची शेजाऱ्याकडे 10 लाखांची चोरी

पुण्यातील चंदननगर परिसरात असलेल्या 'अल्टीस ड्रोम' सोसायटीत राहणाऱ्या आयटी इंजिनिअरच्या पतीने आपल्याच शेजाऱ्याकडे 10 लाखांची चोरी केली

पुणे : पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशाने आपल्याच इमारतीतील एका घरात चोरी केली. तब्बल 10 लाख रुपयांचा ऐवज चोराने लंपास केला होता, मात्र अवघ्या दोन तासात त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. पुण्यातील चंदननगर परिसरात जुना मुंढवा रस्त्यावर असलेल्या 'अल्टीस ड्रोम' सोसायटीत हा प्रकार घडला. 39 वर्षीय पीटर डी रीबेलाने आपल्याच सोसायटीत राहणाऱ्या अग्रवालांच्या फ्लॅटमध्ये चोरी केली. घरात कोणी नसल्याचं पाहून 6 मे रोजी दुपारी पीटरने बाल्कनीतून प्रवेश केला. घरी परत आल्यावर अग्रवाल कुटुंबाला बाल्कनीच्या दाराचं कुलूप तुटलेलं दिसलं. बेडरुममध्ये पाहिलं असता घरातील सोन्या-चांदीचे दागिने, हिरे असा ऐवज चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ चंदननगर पोलिस स्टेशनला याची माहिती दिली. पीटरची चोरी पोलिसांच्या खबऱ्यामुळे अवघ्या दोन तासात उघडकीस आली. त्याच्याकडून दहा लाख 67 हजार 950 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रीबेलाने तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे अग्रवाल यांच्या घरातून स्पीकर चोरले होते. त्याने केलेल्या इतर घरफोड्या उघडकीस आणून आणखी 40 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रीबेला हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 2012 ते 2015 या कालावधीत 26 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे रीबेलाची पत्नी आयटी इंजिनियर असून एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करते. गेल्या दोन वर्षांपासून हे दाम्पत्य सोसायटीत राहत आहे. गेल्या तीन वर्षात त्याने एकही चोरी केली नव्हती, परंतु पैशाची चणचण असल्याने त्याने ही चोरी केल्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget