एक्स्प्लोर

Pune PMPML : आता AC बसमधून करा मनमुराद 'पुणे दर्शन'; PMPML ची नवी बससेवा सुरु, किती असेल तिकीट दर?

पीएमपीएमएलने नागरिकांसाठी एक पर्यटन बस सेवा सुरू केली आहे.   पुणे शहराच्या आसपासच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी 1 मे 2023 पासून पीएमपीएमएल खास वातानुकूलित पर्यटन बस सेवा सुरू केली आहे.

Pune PMPML : शाळांच्या सुट्ट्या लागल्या आहेत, लहान मुलांना  (PMPML)कुठे घेऊन जायचं, फिरायला जायचे असेल तर कुठे आणि कसं जायचं?, हे सगळे प्रश्न पुणे महानगर परिवहन महामंडळाने सोडवले आहेत. पीएमपीएमएलने नागरिकांसाठी एक पर्यटन बस सेवा सुरू केली आहे.   पुणे शहराच्या आसपासच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी 1 मे 2023 पासून पीएमपीएमएल खास वातानुकूलित पर्यटन बस सेवा सुरू केली आहे. या बस शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कार्यरत असणार आहेत. या सेवेसाठी प्रत्येकी प्रत्येक मार्गावर वेगवेगळे दर असतील.

यापूर्वी, तिकीटाच्या किमतींमुळे या सेवेला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. सोशल मीडियावर प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने, पीएमपीएमएलने तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी ही घोषणा केली.

पीएमपीएमएलच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. वातानुकूलित ई-बस प्रवाशांना पुणे आणि आजूबाजूच्या धार्मिक आणि पर्यटनस्थळी घेऊन जातील. एकूण सात पर्यटक बस सेवा आहेत आणि सुधारित तिकीट दर सर्व मार्गांवर लागू करण्यात आले आहेत. 

या सेवेसाठी कुठे बुकिंग करता येईल?
 
परिवहन महामंडळाचे 
1) डेक्कन जिमखाना
 2) पुणे स्टेशन 
3) स्वारगेट
 4) कात्रज 
5) हडपसर गाडीतळ 
6) भोसरी बसस्थानक 
7) निगडी 
8) मनपा भवन
या पास केंद्रावर सदरील बससेवेचे तिकिट बुकींग करण्यात येईल. 

ज्या ठिकाणाहून ही बस सेवा सुरू होणार, तिथपर्यंत पोहचायचे कसे? 

सदरील बससेवेचे ज्या दिवशी बुकींग केले असेल त्या दिवशी सदर प्रवासास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत आणि सायंकाळी पोहचल्यानंतर त्यांना त्यांच्या राहत्या घरापर्यंत सदरील तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा राहील. 

बसमध्ये कुठल्या सुविधा?

प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्येक बसमध्ये गाईड सेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे.

मार्ग कोणते असतील?

मार्ग 1
सुटण्याचे ठिकाण : हडपसर गाडीतळ 
हडपसर, मोरगांव, जेजूरी, सासवड, हडपसर

तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

मार्ग 2
सुटण्याचे ठिकाण : हडपसर गाडीतळ 
हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर

तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

मार्ग 3 
सुटण्याचे ठिकाण : डेक्कन जिमखाना 
डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन

तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

मार्ग 4
सुटण्याचे ठिकाण : पुणे स्टेशन मोलेदिना स्थानक
पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन

तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

मार्ग 5 
सुटण्याचे ठिकाण : पुणे स्टेशन मोलेदिना स्थानक 

पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन

तिकीट दर- 700 रुपये प्रति प्रवासी

मार्ग 6
सुटण्याचे ठिकाणी : पुणे स्टेशन मोलेदिना स्थानक 
पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली). वाडेबोल्हाई छ. संभाजी महाराज समाधीमंदिर (वढू बुद्रुक), रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन

तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

मार्ग 7 - 
सुटण्याचे ठिकाण : निगडी भक्ती शक्ती बसस्थानक 
भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसार्वी मंदिर (चिंचवडू), प्रतिशिर्डी (शिरगांव), देहूगांव, गांथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्ती निगडी

तिकीट दर- 700 रुपये प्रति प्रवासी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget