एक्स्प्लोर

Vasant More : मी आहे तोपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होणार नाही; वसंत मोरेंची डरकाळी!

इतर नेत्यांनी तिकीट दिलं नाही म्हणजे दाद दिली नाही असं होत नाही. याला  मी नकारात्मक घेणार नाही.  मी आहे तोपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होणार नाही, असं ठाम मत वसंत मोरेंनी व्यक्त केलं.

मुंबई : वसंत मोरे  (Vasant Moreयांनी मागील काही दिवसांत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि पुण्यातील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली  महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा (Pune Lok Sabha Constituency) केल्यानंतर वसंत मोरेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यानंतर आज त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. वसंत मोरेंना इतर कोणत्याही पक्षाने किंवा नेत्याने तिकिट दिलं नाही त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकांची भेट घेतली आणि पुणे लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं संगितलं. याच पार्श्वभूमीवर आता वसंत मोरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'इतर नेत्यांनी तिकीट दिलं नाही म्हणजे दाद दिली नाही असं होत नाही. या सगळ्याला  मी नकारात्मक घेणार नाही.  मी आहे तोपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होणार नाही, असं ठाम मत वसंत मोरेंनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं.  ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. चार दिवसांपासून चर्चेसंदर्भात बोलणी सुरु होती. आज पुण्यातील वंचितचे नेते आणि आम्हीदेखील चर्चा केली पुढील एक दोन दिवसात काही फलित बाहेर येईल. 

वसंत मोरे म्हणाले की,  मी पुण्याच टफ फाईट देणार आहे. मी आहे तोपर्यंत पुण्याची लोकसभेची निवडणुक एकेरी होऊ देणार नाही. ही निवडणूक पुणेकरांची निवडणूक आहे.   ही पुण्याची निवडणूक आहे. एका सेनेच्या दोन सेना झाल्या, राष्ट्रवादीतदेखील फूट पडली. या सगळ्या राजकारणाला पुणेकर वैतागले आहेत. 

'पुण्याच्या निवडणुकीला वेळ आहे. बाकी उमेदवार प्रचाराला लागले आहेत. मी आताच नाही तर दोन तीन वर्ष झाले प्रचार करत आहे.  मी मागील तीन चार वर्षांपासून रस्त्यावर उतरुन काम करत आहे.  एसीमध्ये बसून गाडीत बसत प्रचार होत नाही.उन्हात फिरु द्या, रस्त्यावर उतरु द्या आणि लोकांमध्ये काम करु द्या', म्हणत त्यांनी पुण्यातील उमेदवारांना टोला लगावला आहे.   

...हे ऐकून राजकारणात आल्याचं फलित झालं!

सुजात आंबेडकरांची भेट झाली. सुजात मला बोलले मला चांगल्या व्यक्तीला मतदान करायला भेटते याचा आनंद आहे, हे ऐकून राजकारणात आल्याचं फलित झालं आहे. मी पहिल्यांदाच त्यांना भेटलो आणि आज ते खास माझ्यासाठी मुंबईत आले आहेत, असंही ते म्हणाले.  

राज ठाकरेंसंदर्भात काही बोलू शकत नाही!

मनसे महायुतीत सहभागी होत आहे. मात्र त्यांच्यासंदर्भात मी काहीही बोलू शकत नाही. 12 मार्चलाच मनसेचा अध्याय माझ्यासाठी संपला आहे. त्यामुळे मी राज ठाकरेंसंदर्भात काही बोलू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget