एक्स्प्लोर

Pune : पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांचं नाव आघाडीवर, कसबा पोटनिवडणुकीवेळची जादू लोकसभेतही होणार का?

Pune Lok Sabha Election : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मविआच्या रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली होती. त्यानंतर आता लोकसभेसाठीही त्यांचंच नाव आघाडीवर आहे.

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. अनेक दौरे, चर्चा, बैठकीनंतर आता उमेदवार निश्चित होत आलेत. राज्यातील सर्वच जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मतदारसंघावर अनेक पक्षांनी दावा सांगायला सुरुवात केली आहे. यामध्ये महाविकास आघाडीतर्फे कुठला उमेदवार देण्यात येईल याची उत्सुकता होती. कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहर लोकसभेचे उमेदवार (Pune Lok Sabha Election) म्हणून इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर हेच नाव सध्या आघाडीवर आहे. 

कोण आहेत रवींद्र धंगेकर? (Who Is Ravindra Dhangekar) 

काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर 2023 मध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत विजयी झाले. माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठेतील जागा रिक्त झाली होती. कसबा पेठ भाजपचा बालेकिल्ला असून रवींद्र धंगेकर यांनी कसबापेठ पोटनिवडणुकीत बाजी मारली. 

पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय? (Pune Lok Sabha Election History) 

- पुणे शहर लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांनी काँग्रेस उमेदवारांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. 
- 2014 मध्ये काँग्रेसचे विश्वजीत कदम विरुद्ध भाजपचे अनिल शिरोळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी भाजपच्या अनिल शिरोळे यांनी  विश्वजीत कदम यांना 3 लाख 15 हजार मतांनी पराभूत केले होते. 
- 2019 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती तर भाजपकडून गिरीश बापट उमेदवार होते. 
- 2019 मध्ये भाजपकडून अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता भाजप महायुतीकडून गिरीश बापट यांना उमेदवारी दिल्यानं निवडणुकीत काय होईल याची उत्सुकता होती. भाजपचा उमेदवार ठरून अनेक दिवस होऊनही काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला नव्हता. त्यामुळे शेवटी काँग्रेसला निवडणूक अवघड झाली. गिरीश बापट यांनी 2019 च्या या निवडणुकीत 3 लाख मतांनी बाजी मारली होती. 

2024 मध्ये काय होणार? (Pune Lok Sabha Election 2024)

महविकास आघाडीकडून काँग्रेसचे कसबा पेठ विधानसभा आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव आघाडीवर आहे. विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये मोदी लाटेनंतर काँग्रेसला आहोटी लागली. 2014 आणि 2019 मध्ये सर्वाधिक भाजप महायुतीने जागा जिंकल्या होत्या. मात्र 2023 मध्ये झालेली कसबा विधानसभा पोटनिवडणूक (Kasaba By Election Result) रंगतदार आणि प्रतिष्ठेची झाली होती. 

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने अशी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली, प्रचार सभा घेतल्या आणि रवींद्र धंगेकर त्यांचे काम आणि लोकप्रियतेमुळे विजयी झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात ताकद लावण्यात आली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील सभा घेतल्या जात होत्या. तर रवींद्र धंगेकर यांना पूर्ण पाठिंबा देण्यात येत होता. 

सन 2014 आणि 2019 च्या मोदी उदयानंतर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचं इतक्या मोठ्या मताधिक्याने जिंकून येणं हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी मोठा विजय होता. त्यामुळे यावेळी रवींद्र धंगेकर यांच्याकडून काँग्रेसला अशा आहे. 2024 मध्ये देखील तिक्याच मोठ्या प्रमाणात नेत्यांचा आणि जनतेचा त्यांना पाठिंबा मिळतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
Share Market Crash :ट्रम्पच्या ट्रेड वॉरचा इफेक्ट, FPI कडून विक्री, शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
सेन्सेक्स क्रॅश, 1000 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, ट्रम्पच्या टॅरिफ वॉरचा धक्का, FPI कडून विक्री सुरुच
Embed widget