एक्स्प्लोर
Advertisement
Pune Lockdown: पुणेकरांना पुन्हा कडक निर्बंध, सुधारित आदेश जारी
पुण्यात कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर शहरासाठी नवीन आदेश काढण्यात आले आहेत.
पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत. यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर शहरासाठी नवीन आदेश काढण्यात आले आहेत.
काय आहेत नवीन नियम?
- पुणे महानगरपालिका क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे.
- कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे.
- सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते सकाळी 7 या कालावधीत तसेच शुक्रवार सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे.
- अत्यावश्यक सेवांमध्ये रूग्णालयं, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज व फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, मिठाई व खाद्यपदार्थांची दुकाने
- सार्वजनिक वाहतूक – सार्वजनिक बस, टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, पूर्व पावसाळी नियोजित कामे, स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, कृषी संबंधित सेवा, ई- कॉमर्स, मान्यताप्राप्त मीडिया, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे घोषित केलेल्या अत्यावश्यक सेवा यांचा समावेश असणार आहे.
- हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट बंद असणार आहेत. पार्सल सेवा व घरपोच सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू राहणार आहे.
- याशिवाय सर्व धार्मिकस्थळ बंद राहणार आहेत.
- सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
- तसेच, शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत या कालावधीत संपूर्णत: बंद राहणार आहे.
- रिक्षामधून प्रवास करताना वाहन चालक आणि दोन व्यक्तींना परवानगी तर कॅबसाठी 50% आसन क्षमता.
- नागरिकांनी वावरताना समाजिक अंतर व स्वच्छता बाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
- पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने, मार्केट व मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) संपूर्णत: बंद राहणार आहेत.
- पाचपेक्षा जास्त रुग्ण सापडलेल्या सोसायटीला 'मायक्रो कंटेनमेंट झोन' जाहीर करून तिथे बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंद
- नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
हे नियम 10 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) अत्यावश्यक सेवा वगळून 9 एप्रिल पर्यंत संपूर्णत: बंद राहणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
आरोग्य
महाराष्ट्र
Advertisement