एक्स्प्लोर

पुण्यात एक-दोन नाही, तर 3 बिबट्या; एका मागून एकाचा मुक्त संचार, सीसीटीव्हीत घटना कैद

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याच दर्शन होणं काही नवीन नाही. कारण, जुन्नर तालुक्यातील अनेक भागात बिबट्या सर्रास दिसतो, नागरिकांना त्याचे दर्शन होतच असते.

पुणे : वन्यजीव प्राण्यांनी आपला मोर्चा शहरांकडे वळवल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या काही महिन्यांत, वर्षात बिबट्या (Leopard) आणि वाघ यांसारख्या हिंस्र प्राण्यांचाही नागरी वस्तीत वावर झाल्याचं दिसून आलं आहे. अनेकदा या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न देखील केले आहेत. मात्र, अद्यापही शहरात किंवा नागरी वस्तीत बिबट्याचा वावर होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण, काही ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुले आणि प्रौंढानाही आपला जीव गमवावा लागला आहे. आता, पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नरमध्ये चक्क एकामोगोमाग एक असे तीन बिबट्या मुक्तपणे संचार करत असल्याचं एका सीसीटीव्हीत कैद झालं आहे.  

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याच दर्शन होणं काही नवीन नाही. कारण, जुन्नर तालुक्यातील अनेक भागात बिबट्या सर्रास दिसतो, नागरिकांना त्याचे दर्शन होतच असते. मात्र, जुन्नर तालुक्यातील रोहोकडी गावातील एक असा काहीसा व्हिडिओ समोर आलाय की तो पाहून अंगाचा थरकाप उडेल. रोहोकडी येथील विजय जनार्दन मुरादे या शेतकऱ्याच्या घराजवळ एक दोन नाही तर तब्बल तीन-तीन बिबटे फिरताना दिसले आहेत. बिबट्याचा हा मुक्त वावर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. जुन्नर तालुक्यातील मानवी वस्ती असलेल्या परिसरात बिबट्या आल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अनेकदा तर बिबट्याने नागरिकांवर हल्ले देखील केले आहेत. मात्र, तीन-तीन बिबटे एकत्र फिरत असल्याचे पहिल्यांदाच निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये मात्र वन्यप्राण्याची दहशतच पसरली आहे. 

एका मागोमाग एक तिघांचा वावर

सीसीटीव्हीतील हा व्हिडिओ समोर आलयानंतर वन विभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. समोर आलेल्या व्हिडिओत, यावेळी तीन बिबटे एकत्र मुक्त वावर करताना दिसत आहेत. सुरुवातीला एक बिबट समोर येतोय आणि त्यानंतर त्याच्यामागून आणखी दोन बिबटे येताना दिसत आहेत. हे तीनही बिबटे एकत्र पुढे जाताना दिसतात, त्यांचे डोळेही रात्रीच्या अंधारात चमकत आहेत. रोहोकडी येथील माळवाडी-नखलवाडी रोडवरील बोल्हाई माता मंदिराजवळ असलेल्या विजय जनार्दन मुरादे यांच्या घराजवळचं हे दृश्य आहे. प्राथमिक माहितीनुसार हे तीनही बिबटे भक्षाच्या शोधात एकत्र फिरत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तीन-तीन बिबटे अशा पकारे एकत्र फिरत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्र्यांकडून पोस्ट कॅबिनेटमध्ये मंत्र्यांना सक्त ताकीद; देवेंद्र फडणवीसांचा चौघांना टोला, सर्वांनाच इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
Chandrakant Patil and Murlidhar Mohol:
"आण्णा काळजी घ्या, लवकर बरे व्हा!"; शस्त्रक्रिया झालेल्या मुरलीधर मोहोळ यांची चंद्रकांतदादा पाटलांकडून विचारपूस
Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबे काय तुमचा जावई आहे का? भीमाशंकर मंदिरातील दर्शन प्रकारावर रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या...
महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबे काय तुमचा जावई आहे का? भीमाशंकर मंदिरातील दर्शन प्रकारावर रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या...
Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित
मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिदम 'वॉर'रुमकडे
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिद 'वॉर'रुमकडे
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
Embed widget