एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांकडून पोस्ट कॅबिनेटमध्ये मंत्र्यांना सक्त ताकीद; देवेंद्र फडणवीसांचा चौघांना टोला, सर्वांनाच इशारा

राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत आज 8 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मात्र, या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट कॅबिनेट घेत मंत्र्‍यांची कानउघडणी केली.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारमधील सहकारी आणि महायुतीच्या सर्वच मंत्र्यांना पोस्ट कॅबिनेटमधे सक्त ताकीद दिल्याची माहिती आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री महोदयांसोबत आयोजित विशेष बैठकीत मुख्यमंत्र्‍यांनी नाराजी व्यक्त करत मंत्र्‍यांना इशारा दिला. वादग्रस्त वक्तव्य टाळा, माध्यमांशी संवाद कमी करा, आणि जर वाद निर्माण होणारी कृती घडली तर तात्काळ स्वत: योग्य ते स्पष्टीकरण द्या, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या आहेत. गेल्या काही दिवसांत महायुतीमधील (Mahayuti) मंत्र्‍यांच्या वक्तव्यावरुन आणि कृतीवरुन जनतेमध्ये तीव्र संताप व नाराजी पाहायला मिळत आहे. त्यावरुनच, विरोधकही आक्रमक होत मंत्र्‍यांचा राजीनामा मागत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्‍यांनी पोस्ट कॅबिनेट घेत सूचना केल्या. 

राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत आज 8 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मात्र, या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट कॅबिनेट घेत मंत्र्‍यांची कानउघडणी केली. महायुती सरकारमधील काही मंत्र्‍यांच्या वर्तणुकीवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे असतील, शिवसेनेचे योगेश कदम आणि संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे, सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने मुख्यमंत्र्‍यांनी नाराजी व्यक्त केली.  यापुढे जर पुन्हा सरकारला अडचण निर्माण होईल अशी कृती झाली तर मला विचार करावा लागेल, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे. 

राज्यातील महायुती सरकारमध्ये सध्या वादातीत माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, भरत गोगावले आणि योगेश कदम यांना मुख्यमंत्र्‍यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. पोस्ट कॅबिनेट मधे सर्व अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना इशारा दिल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली. कारण, या चारही मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य अन् कृती घडल्याने जनसामान्यांतून टीका होत आहे. 

अजित पवारांकडून माणिकराव कोकाटेंना समज

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांचा आज राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्याच अनुषंगाने माणिकराव कोकाटे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवारांनी कोकाटेंना दम भरला असून यापुढे कुठलीही चूक पाठीशी घातली जाणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्‍यांनी आजच मंत्र्‍यांना इशारा दिला आहे. 

हेही वाचा

ट्रॅफिक पोलिसच ठरला देवदूत; कारच्या भीषण अपघातानंतरही रोहरा कुटुंबीय सुखरुप, भेटून मानले आभार

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
Embed widget