एक्स्प्लोर
पुण्यात ज्वेलर्सवर दरोड्याचा प्रयत्न कर्मचाऱ्याने उधळला

पुणे : पुण्यात एका ज्वेलर्स शॉपला लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव दुकानातल्या कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे उधळला आहे. हडपसरमधल्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये झालेला हा चोरीचा असफल प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
महालक्ष्मी ज्वेलर्सला लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव दुकानातल्या कर्मचाऱ्यानं प्रसंगावधान दाखवत उधळून लावला. बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी मास्क लावून दुकानात प्रवेश केला. दुकानाचं शटर बंद करुन त्यांनी कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखलं.
सुरक्षेसाठी लावलेल्या सायरनच्या शेजारीच एक कर्मचारी बसला होता. जीव मुठीत धरुन त्याने सायरनचा भोंगा सुरु केला. त्यावेळी झालेल्या आवाजानं चोरटे चांगलेच हडबडले. त्यांनी लगेच तिथून पळ काढला. या प्रकरणी दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























