(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray on Ashok Saraf: 'अशोक सराफ दक्षिणेत असते, तर ते आज मुख्यमंत्री असते': राज ठाकरे
Raj Thackeray on Ashok Saraf: 'अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेमध्ये असती, तर ते आज मुख्यमंत्री असते', असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.
Raj Thackeray on Ashok Saraf: 'अशोक सराफ (Ashok Saraf) ही व्यक्ती दक्षिणेमध्ये असती, तर ते आज मुख्यमंत्री असते', असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (RAJ thackeray) म्हणाले आहेत. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये अशोकपर्व (Ashok Saraf) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अशोक सराफ (Ashok Saraf) यांचं राज ठाकरे (RAJ thackeray) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे (RAJ thackeray) असं म्हणाले आहेत.
Raj Thackeray on Ashok Saraf: आपल्याकडे प्रतिमा जेवढ्या जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत: राज ठाकरे
यावेळी बोलताना राज ठाकरे (RAJ thackeray) म्हणाले आहेत की, ''ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो त्याने आपण त्याला आवडतो हे सांगणे आनंद देणारे आहे. समोर कुणीही असो अशोक सराफांना (Ashok Saraf) फरक पडला नाही.'' ते म्हणाले, ''आजही अशोक सराफ (Ashok Saraf) यांचे नाव घेतल्यानंतर सभागृह तुडुंब भरते. इतकी वर्षे एखादा कलावंत काम करतो. अशोक सराफ (Ashok Saraf) जर दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री राहिले असते. त्यांच्या 40 - 40 फूट कटआऊटवर दुग्धाभिषेक झाला असता. आपल्याकडे प्रतिमा जेवढ्या जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत.''
Raj Thackeray on Ashok Saraf: तर त्या देशाचे पंतप्रधान कार्यक्रमात हजर राहिले असते: राज ठाकरे
राज ठाकरे (RAJ thackeray) म्हणाले, मला आज कळलं तुमचं मूळ घराणं बेळगावचं. त्यामुळे तुम्हीच सीमाप्रश्न सोडवला, असं मला वाटतं. ते म्हणाले, मोठ्या माणसांचे सत्कार करायला मोठी माणसे राहिली नाहीत. त्यामुळे आमच्यासारख्यावर आटोपयला लागत. हाच कार्यक्रम जर युरोपात असता तर त्या देशाचे पंतप्रधान कार्यक्रमात हजर राहिले असते. राज ठाकरे (RAJ thackeray) म्हणाले, ''हे लोक आपल्या आयुष्यात नसते तर आपलं काय झालं असतं. हा दागिना फक्त सराफांच्या घरीच मिळू शकतो.'' दरम्यान, सत्कारानंतर अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी राज ठाकरे (RAJ thackeray) आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: