एक्स्प्लोर
पुण्यात महिलेची गळा आवळून हत्या, पतीचं आत्मसमर्पण
पत्नी आई-वडिलांना सांभाळत नाही, घरात छोट्या मोठ्या कारणावरुन भांडत असते, याचा राग मनात धरुन आकाशने पत्नीचा जीव घेतला.

प्रातिनिधीक फोटो
पुणे : घरगुती वादातून पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना पुण्यातील हडपसर परिसरात उघडकीस आली आहे. हत्येनंतर घराला कुलूप लावून पती स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाला. मंगळवारी पहाटे फुरसुंगी भागातील गंगानगर परिसरात ही घटना घडली. झोपेत असलेल्या पत्नीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. माधुरी चव्हाणच्या हत्येप्रकरणी 23 वर्षीय पती आकाश साईनाथ चव्हाणला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी आई-वडिलांना सांभाळत नाही, घरात छोट्या मोठ्या कारणावरुन भांडत असते, याचा राग मनात धरुन आकाशने पत्नीचा जीव घेतला. माधुरी आणि साईनाथ यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती. हत्येनंतर त्याने घराला कुलूप लावलं. आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला आई-वडिलांच्या घरी सोडलं. आरोपी पोलिस ठाण्यात स्वत: हजर झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन याबाबत तपास सुरु केला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























