एक्स्प्लोर
पुणे हिट अँड रन : आजी-नातवाच्या मृत्यूप्रकरणी तरुणाला अटक
होंडा सिटी कारने काल दिलेल्या धडकेत आजी-नातवाचा मृत्यू झाला होता.
पुणे : पुण्यातील खराडी भागात झालेल्या 'हिट अँड रन' प्रकरणी 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. होंडा सिटी कारने काल दिलेल्या धडकेत आजी-नातवाचा मृत्यू झाला होता. आरोपी सौरभ जासूद हा महापालिका अधिकारी शशिकांत जासुद यांचा मुलगा आहे.
सौरभ चालवत असलेल्या भरधाव होंडा सिटीने काल रात्री आठ वाजताच्या सुमारास तिघा जणांना उडवलं होतं. यामध्ये 61 वर्षीय महिला आणि तिच्या 11 वर्षीय नातवाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
सौरभ भरधाव वेगाने खरडीच्या रॅडिसन हॉटेलजवळून जात होता. त्यावेळी त्याचं कारवरुन नियंत्रण सुटलं आणि त्याने तिघा जणांना उडवलं. यानंतरही वेग कमी न झाल्यामुळे कार थेट जिप्सीला धडकली. अपघातानंतर सौरभ जासूद फरार झाला होता.
कार चालकाच्या अटकेसाठी आज संतप्त नागरिकांनी खराडी ते मुंढवा या मार्गावर रास्ता रोको केला होता. अखेर सौरभ जासूदला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे अपघातानंतर एक तरुणी कारमधून बाहेर पडताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
होंडा सिटी कार पुणे महापालिकेचे अधिकारी शशिकांत जासुद यांच्या मालकीची असल्याचं समोर आलं. शशिकांत जासूद हे वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयात मालमत्ता कर विभागात अधिकारी आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement