एक्स्प्लोर

Pune Heavy Rain: पुण्यात पुन्हा पूरस्थिती; खडकवासला धरण 65 टक्क्यापर्यंत खाली करा, अजित पवारांच्या सूचना

Pune Rain : खडकवासला धरण हे 65 टक्केपर्यंत खाली केलं तर रात्री पाऊस पडला तर धरणात पाणी राहील असे अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत.

Pune Rain Update :  पुण्यात धरण परिसरात (Pune Rain News)  तुफान पाऊस सुरू आहे.  धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.दरम्यान पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झालीय. सोसायटी मधील नागरिकांना बाहेर काढण्यात येतंय. दरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग  वाढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे तसेच  निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.  

  खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरण भरू लागली आहेत. धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहे. धरणात 65 टक्केपर्यंत पाणी सोडावे असे अजित पवारांनी सांगितले. तसेच पाणी सोडताना नागरिकांना सूचित करावं असे देखील अजित पवारांनी सांगितले आहे. खडकवासला धरण हे 65 टक्केपर्यंत खाली केलं तर रात्री पाऊस पडला तर धरणात पाणी राहील असे अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री- उपमुख्यमंंत्री?

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे आणि जिल्हा परिसरात आज जोराचा पाऊस होत असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.

नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर करा : मुख्यमंत्री  

पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प , रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर,  बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री  शिंदे यांनी दिल्या आहेत.

निवासस्थाने, खाण्याची सोय करा : मुख्यमंत्री

संपूर्ण प्रशासनाने या काळात अलर्ट राहावे. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी सर्व सुविधांची उपलब्धता करून देणे यासाठी सर्व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. हवामान खात्याकडून येणाऱ्या विविध सूचनांची दखल घेऊन त्याची लोकांना त्वरित माहिती देण्यात यावी. सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देखील  मुख्यमंत्री  शिंदे यांनी दिल्या आहेत.

हे ही वाचा :

Pune Rain Update: पुणेकरांची चिंता वाढली! खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला, सिंहगड रस्त्यावरील निंबज नगर, एकता नगरमध्ये पाणी भरले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Aditi tatkare On Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेमुळे शिक्षकांचे पगार उशीराने?Special Report : Suresh Dhas यांचे आरोप ,महायुतीमध्ये Dhananjay Munde एकाकी पडलेत?Special Report : Suresh Dhas यांच्या आरोपांना बीडमधील जातीय समीकरणांची किनार?Zero Hour : मेलबर्न कसोटीतही भारतीय फलंदाजांची नांगी, भारताची दुसऱ्या दिवसअखेर 5 बाद 164 अशी अवस्था

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Rohit Sharma : तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Embed widget