Pune Rain Update: खडकवासला धरणातून 45 हजार पाण्याचा विसर्ग वाढवणार; नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
Pune Rain Update : पुण्यात धरण परिसरात तुफान पाऊस सुरू आहे. खडकवासाला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. प्रशासन अलर्ट मोडवर असून लष्कर तैनात करण्यात आले आहे.

Background
Pune Rain Update : पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसंच पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात भारतीय लष्कर तैनात करण्यात येणार आहे..
पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Pune Rain Alert : मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु
Pune Rain : खडकवासला धरणातून खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार, पावसाचा जोर ओसरल्याने काहीसा दिलासा
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 35002 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो सायंकाळी 05:00 वा. 45705 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, अशी माहिती देण्यात आली आहे.
Pune Dam Water: खडकवासला विसर्ग सायंकाळी 45705 क्यूसेक्सने करणार, पावसाचा जोर ओसरला
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 35002 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो सायंकाळी 05:00 वा. 45705 क्यूसेक्स करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, अशी माहिती खडकवासला पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.























