LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील पुरस्थितीचा घेतला आढावा, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना
Heavy Rain in Western Maharashtra: पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
LIVE
Background
पुणे: पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्याने नद्यांना पूर आला आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे मुठा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. तर कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली आहे. कोयना आणि राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत.
मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे दरम्यानच्या एक्सप्रेस गाड्या रद्द
मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान धावणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. बदलापूर आणि वांगणी दरम्यान उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेऊन या एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मध्य रेल्वे सांगितले आहे. मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आलेले आहेत, तर उद्या सकाळी पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द असतील.
Ajit Pawar On Pune Rain : पुण्यातील वारजे भागात ज्या जनावरांचा मृत्यू झाला त्याचे पंचनामे केले जाणार, अजित पवारांनी दिली माहिती
पुण्यातील वारजे भागात म्हशी ज्या जनावरांचा मृत्यू झाला त्याचे सुद्धा पंचनामे केले जाणार आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. वारजे येथील स्मशानभूमी परिसरातील नदी पात्रालगत जनावरे बांधली होती. रात्री अचानक पाऊस सुरू झाला. नदीपात्रातील पाणी वाढल्याने पाणी गोठ्यात शिरलं. हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला. या गोठ्यात बांधलेली 14 जनावरे पाण्यात बुडाल्याने दगावली आहेत. यामध्ये 11 गाईंचा समावेश आहे. तर चार ते पाच जनावरे पाण्यात तोंड वर करून उभी राहिल्याने बचावली आहेत.
Pune Rain : अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून मदत व बचत कार्याचा घेतला आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका येथे अधिकाऱ्यांकडून मदत व बचत कार्याचा आढावा घेतला. नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली व पावसाची स्थिती लक्षात घेऊन विसर्ग करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. ४८ तास धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. लवासा येथे दरड कोसळल्याने मदत कार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासन सतर्क राहून काम करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन. दुर्घटनेत जखमी झालेल्याचा खर्च महानगरपालिका व शासनातर्फे करण्याच्या सूचना. वेगवेगळ्या भागात एनडीआर एफच्या तुकड्या तैनात. आंबील ओढा भागातही खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Pune Rain Update: पुण्यात गोठा बुडून 14 जनावरे दगावली, नदीपात्रातील पाणी वाढलं अन्...
वारजे येथील स्मशानभूमी परिसरातील नदी पात्रालगत जनावरे बांधली होती. रात्री अचानक पाऊस सुरू झाला. नदीपात्रातील पाणी वाढल्याने पाणी गोठ्यात शिरलं. हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला. या गोठ्यात बांधलेली 14 जनावरे पाण्यात बुडाल्याने दगावली आहेत. यामध्ये 11 गाईंचा समावेश आहे. तर चार ते पाच जनावरे पाण्यात तोंड वर करून उभी राहिल्याने बचावली आहेत.
Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाने अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली
पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक छोटे आणि मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. पुण्यातील बहुतांश अंडरपास सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहतूक कोंडी आणि इतर दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे.
बंद असलेले पूल आणि अंडर पास पुढीलप्रमाणे
शांतीनगर पूल
भिडे पूल
न. ता. वाडी अंडरपास
जयवंतराव टिळक पूल
जुना होळकर ब्रीज
जुना मांजरी पूल
पोल्ट्री अंडरपास
बोपोडी अंडरपास