एक्स्प्लोर

Pune News: पुणे जिल्ह्याच्या पदरी दमदार खाती; राज्यमंत्री माधुरी मिसाळांच्या माध्यमातून मित्रपक्षांच्या खात्यावरही भाजपचं लक्ष, वाचा यादी

Pune News: आमदार माधुरी मिसाळ राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे पाच विभागांची जबाबदारी देण्यात आली असून, ही सर्व खाती शिवसेना व राष्ट्रवादीकडे आहेत.

पुणे: राज्यातील मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडून जवळजवळ एक आठवडा होत आल्यानंतर काल (शनिवारी) खातेवाटप पूर्ण झालं आहे. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप काल(ता. 21 शनिवारी) रात्री जाहीर झाले. या खातेवाटपामध्ये पुणे जिल्ह्याच्या वाट्याला चांगली दमदार खाती आली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते आले आहे, त्याचा फायदा जिल्ह्यातील 21 इतर आमदारांना होऊ शकतो, तर भाजपने नगरविकास राज्यमंत्रिपद पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे दिलेले आहे.

महायुतीच्या नवीन सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पुण्यातील चार आमदारांचा समावेश आहे. अजित पवार, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय भरणे आणि माधुरी मिसाळ या 4 आमदारांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश आहे. खाते वाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभाग देण्यात आला आहे, तर आधीच्या महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेना शिंदेंच्या पक्षाकडे असलेलं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलं आहे. तर भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे आधीच्या सरकारमध्ये असलेलं उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि संसदीय कामकाज हे दोन्ही विभाग तसेच कायम ठेवण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आमदार माधुरी मिसाळ राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे पाच विभागांची जबाबदारी देण्यात आली असून, ही सर्व खाती शिवसेना व राष्ट्रवादीकडे आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगरविकास विभागाच्या माधुरी मिसाळ राज्यमंत्री आहेत. त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांच्याकडे असलेलं वैद्यकीय शिक्षण, दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेलं अल्पसंख्याक विभाग, संजय शिरसाट यांच्याकडे असलेलं सामाजिक न्याय विभाग आणि प्रताप सरनाईक यांच्याकडे असेलेलं वाहतूक विभाग या खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या महत्त्वाच्या खात्यांवर फडणवीसांचे राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून लक्ष असणार असल्याच्या चर्चा आहेत.

जिल्ह्यातील मंत्र्यांकडे जबाबदारी

कॅबिनेट

उपमुख्यमंत्री अजित पवार : अर्थ, नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क

आमदार चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

आमदार दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास

राज्यमंत्री

माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास

खातेवाटप झालं आता पुण्याचं पालकमंत्रिपदी कोणत्या दादाकडे?

मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप त्यानंतर आता सर्वांचं लक्ष हे पालकमंत्री पदाकडं लागलं आहे. पुण्याचे पालकमंत्रिपदी कोणत्या दादाची वर्णी लागणार याची चर्चा आहे. महायुतीच्या पूर्वीच्या सरकारमध्ये काही वर्ष चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री होते. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये आल्‍यानंतर हे पद त्यांच्याकडे गेलं, त्यानंतर चंद्रकांत पाटलांना सोलापुरचे पालकमंत्री पद देण्यात आलं होतं, आता नव्या सरकारमध्ये पालकमंत्रीपद अजित दादांकडेच की भाजप पुन्हा चंद्रकांत दादांच्या ताब्यात जाणार याकडे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat : परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव
परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव
संतापजनक... पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
संतापजनक... पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidarbha Heat: विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा; अकोला ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर, उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
सूर्य कोपला! विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा; अकोला ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर, उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Ajit Pawar : अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन, ठाण्यातील हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन, ठाण्यातील हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानियांचा आरोप
Bhushan Pradhan Marriage: मराठीतल्या चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
मराठी अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी डॉक्टरांमधील करुणा अन् प्रामाणिकपणा महत्त्वाचा; राष्ट्रपती मुर्मूंचा सल्ला
वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी डॉक्टरांमधील करुणा अन् प्रामाणिकपणा महत्त्वाचा; राष्ट्रपती मुर्मूंचा सल्ला
संतापजनक... पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
संतापजनक... पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
Radhakrishna Vikhe Patil on Ashok Kharat: 'एकनाथ शिंदे शिर्डीत आले अन् मला म्हणाले, एके ठिकाणी जायचंय...'; राधाकृष्ण विखे-पाटलांनी सांगितली अशोक खरातच्या भेटीमागची कहाणी
'एकनाथ शिंदे शिर्डीत आले अन् मला म्हणाले, एके ठिकाणी जायचंय...'; राधाकृष्ण विखे-पाटलांनी सांगितली अशोक खरातच्या भेटीमागची कहाणी
MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
Taxi And Rickshaw Licenses: मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स होणार रद्द; राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा विरोध
मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स होणार रद्द; राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा तीव्र विरोध
Embed widget