एक्स्प्लोर
पुण्यात हडपसरमध्ये गुंडांची एकाला मारहाण, गाड्यांचीही तोडफोड
पुणे : हडपसरमध्ये पूर्ववैमनस्यातून गुंडांच्या टोळक्याने एकाला जबर मारहाण केली आहे. मारहाणीबरोबरच परिसरात दहशत माजवून या गुंडांनी चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी वाहनांचीही तोडफोड केली.
रविवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून लहान मुले आणि महिलांची जीव वाचवण्यासाठी धांदल उडाली. गेल्या काही महिन्यांपासून पुणे-पिंपरी परिसरात गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड होण्याच्या घटना वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी मारहाण, गाड्यांची तोडफोड आणि दहशतीचं वातावरण निर्माण करणं या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement