Pune Fire News: पिंपरीत बिगारी कामगाराच्या झोपडीला आग! पाच लाख सत्तर हजारांची रोकड अन् साडे चार तोळे सोनं जळून खाक, इतके पैसे-दागिने कुठून आले?
Pune Fire News: बिगारी कामगारांच्या घरातील लाखो रूपयांची रोकड आणि सोने जळून खाक झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे: पिंपरी चिंचवड शहरात बिगारी कामगारांच्या घराला आग (Pune Fire News) लागल्याची घटना समोर आली आहे. पिंपळे गुरव परिसरातील काशीद पार्क जवळील बिगारी कामगारांच्या पत्रा शेड झोपडपट्टीत आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या घटनेमध्ये बिगारी कामगारांच्या घरातील लाखो रूपयांची रोकड आणि सोने जळून खाक झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Fire News)
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात बिगारी कामगारांच्या घराला आग लागून, लाखो रुपयाची रोकड जळून खाक झाली आहे. पिंपळे गुरव परिसरातील काशीद पार्क जवळील बिगारी कामगारांच्या पत्रा शेड झोपडपट्टीत आज सकाळी साडेअकरा वाजता आग लागली. या आगीत लाखो रुपयांची रोख रक्कम पूर्णपणे जळून खाक झाली आहे. जळालेल्या रोख रकमेचे व्हिडीओ समोर आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. मात्र, इतकी कोरड जळाल्याने मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात बिगारी कामगारांच्या घराला आग लागून, लाखो रुपयाची रोकड जळून खाक झाली आहे. #Firenews #Punenews #Punefire pic.twitter.com/4Z5SXqO3Ew
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) January 23, 2025
झोपडीत इतके पैसे-दागिने कुठून आले?
पिंपरी चिंचवडच्या लेबर कॅम्पमधील झोपड्यांना आग लागली होती, धक्कादायक म्हणजे या आगीत पाच लाख सत्तर हजारांची रोकड आणि साडे चार तोळे दागिने जळून खाक झाले आहेत. झोपडीत एवढी रक्कम आणि सोन्याचे दागिने कुठून आले, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. करिअप्पा गुंडापुर या मुकादमाची ही झोपडी होती आणि त्याला सेन्टरिंगच्या ठेकेदारांनी दिल्याचं समोर आलं आहे. बानेरचे विठ्ठल पन्हाळे आणि हिंजवडीचे गजानन गदाडे अशी त्यांची नावं आहेत. पण या दोघा ठेकेदारांनी एवढी रक्कम कुठून आणली याचा शोध आता सांगवी पोलीस घेत आहेत.
गोटे गावच्या हद्दीत गॅस पाईपच्या गोडाऊनला भीषण आग
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत एका गॅस पाईपच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना आज गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. आगीत पाईपलाईनचे साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गॅस पाईपचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे पाईपलाईन ठेवलेले गोडाऊन आहे. या गोडावूनला आज, दुपारी अचानकच आग लागली. आगीच्या धुराचे लोट मोठ्या प्रमाणात होते. आगीत पाईपलाईनचे साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान आगीचे कारण अस्पष्ट आहे. त्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांचा आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.