(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune drugs Viral Video :कार्ट्या असले उद्योग करतात, हे संस्कार म्हणायचे का?; नशेत टुल्ल असणाऱ्या पोरींचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले!
राज्याला हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील तरुणाई नशेत टुल्ल असल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओतील प्रकार पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे
पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक (Pune Drugs) आणि राज्याला हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील तरुणाई नशेत टुल्ल असल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. अभिनेते रमेश परदेसी यांनी हा व्हिडीओ समोर आणल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि या व्हिडीओतील प्रकार पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तर अनेकांनी राज्याची तरुणाई अशी वागत असेल आणि ड्रग्सच्या आहारी गेली असेल राज्याचा उडता पंजाब कडे वाटचाल सुरु असल्याच्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. 'हा विषय फक्त पुण्याचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.'उडता पंजाब नुसता नावालाच आहे खरं गंभीर परिस्थिती आपल्या तर महाराष्ट्रात आहे. काय करत आहे गृह खातं'अवघड आहे. हे संस्कार म्हणायचे का ॽज्या आईबापाने तुमचं भविष्य घडाव म्हणून जीवाचं राण केलं.आणि या कार्ट्या असले उद्योग करतात . काय म्हणावं?, असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहे.
राज्यातूनच नाही तर देशविदेशातून तरुण पुण्यात शिक्षणासाठी येत असतात. अनेक पालक विश्वासाने पुण्यात शिक्षणासाठी पाठवत असतात. आपलं मुल उत्तम शिकून पुढे जाईल, या एका अपेक्षेपोटी अनेक पालक मोठ्या आकड्याच्या फी भरुन महागड्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. मात्र हे मुलं पुण्यात येऊन नशेच्या विखळ्यात अडकताना दिसत आहेत. एवढंच नाही तर या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे मुलीदेखील भविष्याचा विचार न करता क्रेझ म्हणून ड्रग्सच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालकांनीदेखील आपल्या मुलांकडे तेवढ्याच काटेकोरपण लक्ष ठेवण्याची गरज आहे.
आपण सजग नागरीक कधी होणार
या व्हिडीओत बोलताना रमेश परदेसींनी पालकांवरदेखील काही प्रमाणात आरोप केले आहे. शिवाय हे प्रकरणं गांभीर्यानं घेण्याचं आवाहनही त्यांनी पालकांना केलं आहे. आपण एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडं गांभीर्यानं बघणार आहोत की नाही. पुण्यात 4 हजार कोटी ड्रग्ज सापडलं पण पुणेकरांनी यावर साधी एक प्रतिक्रिया दिलेली नाही. मागे ललीत पाटील सापडला आणि आता हे. त्याचा केवळ राजकारणासाठीच वापर झाला. पण यामुळं तरुण पिढी बरबाद होत आहे याचा आपण गांभीर्यानं विचार करणार आहोत का नाही? जर आत्ताच काही केलं नाहीतर पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
View this post on Instagramइतर महत्वाची बातमी-
Pune Crime News : पुण्यातील तरुणाई नशेत तुल्ल; पिट्या भाईंनी समोर आणला राज्याला हादरवणारा व्हिडीओ...