एक्स्प्लोर

Pune Dog Park : श्वानप्रेमीसाठी आनंदाची बातमी; मुंबई आणि हैदराबादनंतर पुण्यातही साकारणार पहिलं 'Dog park'

  पुण्यात मोठ्या प्रमाणात श्वानप्रेमी आहेत. याच श्वानप्रेमींसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मुंबई आणि हैदराबाद डॉग पार्क नंतर आता पुण्यात शहरातील पहिलावहिला डॉग पार्क  साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : पुण्यात मोठ्या प्रमाणात श्वानप्रेमी आहेत. याच श्वानप्रेमींसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मुंबई आणि हैदराबाद डॉग पार्क (Dog Park) नंतर आता पुण्यात शहरातील पहिलावहिला डॉग पार्क साकारण्याचा निर्णय घेतला आहे. कात्रज-कोंढवा परिसरातील तीन एकर जागेत हे डॉग पार्क साकारण्यात येणार आहे. 

श्वानप्रेमी पुणेकरांच्या अनेक तक्रारी आतापर्यंत येत होत्या शिवाय स्थानिक नागरिकांच्यादेखील अनेक तक्रारी पुढे येत होत्या. अनेकदा या तक्रारी वैयक्तिक पातळीवर न राहता पोलिसांपर्यंत गेल्या आहेत अनेकदा भांडणंदेखील झाली आहेत. श्वानप्रेमींना आपल्या लाडक्या श्वानांना बाहेर फिरायला नेताना अनेकदा श्वानप्रेमींना अन्य नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागायचं. मात्र या डॉग पार्कमुळे आता बंदिस्त सुरक्षित जागेत त्यांना आपल्या श्वानांना मोकळेपणे खेळायला आणि त्याद्वारे व्यायामाची संधी मिळणार आहे. कात्रज-कोंढवा येथील फ्लायओव्हरच्या खाली अन्य कोणत्याही नागरी योजना नसल्याने ही जागा डॉग पार्कसाठी देण्यात आली आहे. या पार्कसाठी अंदाजे 1 ते 5 कोटी रुपयांचे बजेट मंजूर होण्याची शक्यता आहे.

पुणे शहराची लोकसंख्या जसजशी वाढत आहे, तशी प्राणीप्रेमी आणि श्वानपालकांचीही संख्या वाढत आहे. मात्र अन्य नागरिकांसाठी जसे बागा, उद्याने आणि ग्राऊंड राखीव ठेवण्यात येतात, तसे संपूर्ण शहरात एकही जागा नाही जिथे श्वानपालक आपल्या श्वानांना मोकळेपणे खेळायला सोडू शकतील. रस्त्यावरुन त्यांना फिरवताना अनेक नागरिक तक्रार करतात, तसेच त्यांच्या मल-मूत्राच्या दुर्गंधीचाही प्रश्न निर्माण होतो. यासाठी हे राखीव डॉग पार्क आवश्यक होते. येथे श्वानांसाठी अनेक खेळ आणि तसेच जलतरण तलावाचीही सोय करण्यात येणार आहे.

मुंबई आणि हैदराबाद येथील डॉग पार्कसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते आणि त्यातूनच पार्कची देखभाल केली जाते. त्याच धर्तीवर पुणे महापालिकाही पार्कच्या शुल्कातून व्यवस्थापन खर्च भागवणार आहे. आजच्या घडीला पुण्यात सुमारे 8000 अधिकृत नोंदणी केलेले पाळीव श्वान आहेत. ज्यांनी नोंदणी केली नाही अशांची संख्या सुमारे 80 हजार ते एक लाखाच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.

या पार्कमध्ये एक पशुवैद्यकीय विभाग तसेच ग्रूमिंग पार्लरदेखील असणार आहे. या दोन्ही सुविधा सशुल्क असतील. या पार्कमध्ये भटकी कुत्री प्रवेश करणार नाहीत, याचीही योग्य ती काळजी घेण्यात येईल. तसेच त्यांच्या नसबंदीची योजनाही सुरु राहिल. डॉग पार्कच्या जागेची नीट पाहणी करुन मगच त्याची निश्चिती करण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या-

GK: पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेऊ शकतो का? तर उत्तर आहे 'हो'; पण त्याआधी जाणून घ्या 'या' गोष्टी

 
 

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget