एक्स्प्लोर

धुमाळविरुद्ध आणखी एका बिल्डरची तक्रार, रश्मी शुक्लांची गुपचिळी

पुणे : 25 लाखांची खंडणी मागूनही रश्मी शुक्ला यांच्या आशीर्वादामुळे सुशेगाद असलेल्या पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळचे नवनवे कारनामे उजेडात येऊ लागले आहेत. 2012 मध्ये धनंजय धुमाळनं एटीएसमध्ये असताना अजय चौधरी नावाच्या बिल्डरचाही पैशासाठी छळ केल्याचा आरोप आहे.   भांडारकर रस्त्यावर राहणाऱ्या चौधरींच्या घरावर अपरात्री छापा टाकून धुमाळनं तुमचे दाऊदशी संबंध आहेत, असा आरोप केला. तसंच शिवीगाळ करत पैशांची मागणी केली.  या सगळ्या प्रकाराविरोधात चौधरी यांनी न्यायालयात दाद मागितली.     त्यानंतर धुमाळवर गुन्हाही दाखल झाला होता. मात्र त्याची चौकशी झाली नाही. विशेष म्हणजे रविंद्र बऱ्हाटे यांनीही धुमाळनं आपल्याला पैशांसाठी धमकावल्याचा दावा केला आहे. एटीएसच्या कार्यालयात बोलावून धुमाळनं पैशांसाठी छळ केल्याचं बऱ्हाटेंचं म्हणणं आहे.    

पुणे पोलीस आयुक्तांच्या नावे खंडणी; पोलीस निरीक्षकावर कारवाईऐवजी फक्त बदली

धनंजय धुमाळवर रश्मी शुक्लांनी दाखवलेल्या मेहरबानीचं कारणही तसंच आहे. संदीप जाधव आणि हेमंत गांधींनी 80 लाख रुपये स्टँप ड्युटी भरुन बाणेरमधील 15 गुंठे जमीन संजय मुथा यांच्याकडून विकत घेतली. खरंतर एटीएसचा आणि जमीन प्रकरणाचा संबंध नसतानाही रश्मी शुक्लांनी हे प्रकरण तपासासाठी धनंजय धुमाळकडे दिलं.   एटीएसमध्ये असलेल्या धुमाळकडे प्रकरण सोपवल्यानंतर अडचण येऊ नये म्हणून रश्मी शुक्लांनी धुमाळची बदलीही प्रॉपर्टी सेलला केली आणि त्यानंतर मॅडमना 25 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगून धुमाळ धमकावत राहिला. आता याच मेहरबानीमुळं रश्मी शुक्लांनी धनंजय धुमाळला वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget