एक्स्प्लोर

चहा न दिल्याच्या रागातून नोकराकडून दीपाली कोल्हटकरांची हत्या

कोल्हटकरांकडे नव्याने ठेवलेला नोकर रोज रात्री बारापर्यंत थांबायचा, मात्र घटनेच्या दिवशी एक तास आधीच निघून गेल्यामुळे त्याच्यावर संशय बळावला.

पुणे : चहा न दिल्याच्या रागातून ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांची पत्नी दीपाली कोल्हटकरांची हत्या झाली आहे. आरोपी किसन मुंडे प्राथमिक तपासात पोलिसांना ही कबुली दिल्याची माहिती आहे. दिलीप कोल्हटकर पुण्यातील कर्वेनगरमधील घरात 65 वर्षीय पत्नी दीपाली आणि 85 वर्षीय सासूसह राहतात. उस्मानाबादच्या 19 वर्षीय किसन अंकुश मुंडेला काही दिवसांपूर्वीच शुश्रूषेसाठी मदतनीस म्हणून ठेवण्यात आलं होतं. कोल्हटकर यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा अमेरिकेत असतो. तर मुलगी कर्वेनगर परिसरातच वास्तव्यास आहे. कोल्हटकरांकडे दिवसपाळी आणि रात्रपाळीसाठी दोन नोकर आहेत. कोल्हटकर यांच्या घरातील स्वयंपाकघरातून गुरुवारी (8 फेब्रुवारी) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास धूर निघू लागल्याने शेजाऱ्यांनी धाव घेऊन पाहिलं असता दीपाली कोल्हटकर या जळालेल्या अवस्थेत आढळल्या. पोलिसांना याची माहिती देऊन त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शवविच्छेदनात दीपाली कोल्हटकर यांच्या डोक्याला गंभीर जखम असल्याचं आढळलं. गळा दाबून आणि डोक्यात जड वस्तूने प्रहार करुन झाल्याचं निष्पन्न झालं होतं. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. कोल्हटकरांकडे नव्याने ठेवलेला नोकर रोज रात्री बारापर्यंत थांबायचा, मात्र घटनेच्या दिवशी एक तास आधीच निघून गेल्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी किसन मुंडेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्या केल्याचं कबूल केलं होतं. दीपाली यांनी चहा न दिल्यामुळे रागाच्या भरात त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपीने प्राथमिक तपासात पोलिसांना दिली आहे.

संबंधित बातमी :

नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

नाटककार दिलीप कोल्हटकरांच्या पत्नीची नोकराकडूनच हत्या

महत्त्वाच्या बातम्या

Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Embed widget