(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Dashrath Jadhav News: बारामतीकराच्या जिद्दीला सलाम! जगातील सर्वात अवघड 'सायकल स्पर्धा' केली जिद्दीने पार
गभरातील सर्वात कठीण समजली जाणारी लंडन एडीनबर्ग लंडन ही सायकल स्पर्धा 66 वर्षीय दशरथ जाधव यांनी पूर्ण केली आहे. मूळचे बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावचे सुपुत्र दशरथ जाधव यांनी पूर्ण केली आहे
Pune Dashrath Jadhav News: जगभरातील सर्वात कठीण समजली जाणारी लंडन एडीनबर्ग लंडन ही सायकल स्पर्धा 66 वर्षीय दशरथ जाधव यांनी पूर्ण केली आहे. मूळचे बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावचे सुपुत्र दशरथ जाधव (dashrath jadhav) यांनी पूर्ण केली आहे. मूळचे बारामती तालुक्यातील परंतु पुण्यात स्थित असलेले प्रसिद्ध उद्योजक दशरथ दिनकर जाधव यांनी लंडन आणि इडनबर्ग या दोन शहरांमध्ये होणारी जगातील सर्वात अवघड समजली जाणारी 1520 km (930 मैल) सायकल स्पर्धा वयाच्या 66 व्या वर्षी 125 तास 33 मिनिटांमध्ये या विक्रमी वेळेत पूर्ण करून इतिहास रचला आहे.
66 वर्षी ही स्पर्धा पूर्ण करणारे दशरथ जाधव हे पहिले भारतीय ठरले आहेत. लंडन- एडिनबर्ग- लंडन ही 1520 किलो मिटरची अत्यंत कठीण अशी सायकल स्पर्धा आहे. 1520 किलोमीटर सायकलिंग 128 तासात पुर्ण करयाचे आसतात. यामध्ये एकुण 20 कंट्रोल पॉईंट्स होते आणि दोन कंट्रोल पॉईंट्स मधील अंतर कोणत्याही सोयी किंवा मदती शिवाय तेही ठराविक वेळेतच पुर्ण करायचे असते. स्पर्धा चालु असताना नियमानुसार लहान चुक जरी झाली असता स्पर्धकाला बाद ठरविले जाते. आशा परिस्थितीत स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे स्पर्धकाची शारीरिक तसेच मानसिक परिस्थितीचा कस बघणारी असते. शारीरिक आणि मानसिक परिस्थितीचा दोन्हीचा समतोल साधत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते.
ही स्पर्धा पूर्ण करताना जवळपास 47,564 ft चढ आणि 47,563ft उतार असलेल्या डोंगराळ रस्त्यावरून, ऊन, वारा,पाऊस असताना देखिल अतिशय किचकट परिस्थितीत 128 तासांत हि स्पर्धा पुर्ण करावी लागते. परंतु दशरथराव दिनकर जाधव यांनी हि स्पर्धा 125 तासातच पुर्ण करुन एक नवा विक्रम केला आहे.. दशरथ जाधव भारतातील एकमेव स्पर्धक ज्यांनी हि स्पर्धा वयाच्या 66 व्या वर्षी पुर्ण करत एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. दशरथ जाधव यांच्या यशामुळे महराष्ट्रची नव्हे तर संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. जाधव यांचा वयाच्या 66 वर्षी ही स्पर्धा पूर्ण करून विक्रम केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जाधवयांचा आदर्श सर्वानी घेलता पाहिजे. या स्पर्धेत अनेक भारतीयांचा समावेश होता परंतु सर्वात वयस्कर स्पर्धक असूनदेखील वेळेच्या 3 तास आधीच जाधव त्यांनी अनेक तरुण स्पर्धंकाच्या आधी ही स्पर्धा पुर्ण केली.
या स्पर्धे मध्ये 120 भारतीय सायकल स्वरांनी भाग घेतला होता त्यातील 47 भारतीय सायकल स्वरांनी स्पर्धा पूर्ण केली आहे. दशरथ जाधव यांनी वयाच्या 60 व्या वर्षी आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करून आयर्नमेंटचा किताब मिळाला होता. त्या नंतर दशरथ जाधव यांनी सलग 7 वेळा आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण केली आहे. आयर्न मॅनचा किताब मिळवणारे जाधव हे सर्वात वयोरुद्ध भारतीय आहेत.
दशरथ जाधव यांना व्यायामाची गोडी कशी लागली?
वाढत्या वयासोबत सोबत येणाऱ्या व्याधी देखील दशरथ जाधवांना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी व्यायामला सुरुवात केली.. सुरवातीला जिम मग परत रनिंग आणि सायकलिंग सुरू केलं.. सुरुवातीला ते छोट्या छोट्या मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हायचे..कालांतराने त्यांना आर्यन मॅन स्पर्धेबद्दल माहिती मिळाली मग त्यांनी आर्यन मॅनची तयारी सुरू केली.. सलग 7 वेळा आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण केल्यानंतर आता जाधव यांनी सर्वात अवघड समजली जाणारी सायकल स्पर्धा पूर्ण केली आहे. आज देखील दररोज 3 ते 4 तास व्यायाम दशरथ जाधव करतात..