Pune crime News: 2 कोटी द्या नाहीतर...; खंडणीसाठी धमक्या देणाऱ्या RTI कार्यकर्त्याला अटक
ण्यात खंडणी विरोधी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल दोन कोटींची खंडणी उकळणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला पुण्यात अटक करण्यात आली आहे.
Pune Crime News: पुण्यात खंडणी विरोधी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल दोन कोटींची खंडणी उकळणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला पुण्यात अटक करण्यात आली आहे.दत्तात्रय फाळके असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. या सगळ्या प्रकाराबाबत तीस वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
तक्रारदाराच्या कंपनी नगर जिल्ह्यातील जामखेडमधील आढळगावमध्ये सुरु असलेल्या कामाच्या परवानग्या घेतल्या का?, त्यासाठीची रॉयल्टी पेमेंट घेतली का? असे प्रश्न विचारत तक्रारदाराला ब्लॅकमेलींग करण्यात आलं. तुमच्या कंपनीला दंड चुकवायचा असेल तर 2 कोटी द्या नाहीतर माहितीच्या अधिकारातून माहिती घेऊन कोर्टात केस करेल, अशा धमक्या आरोपी देत होता. याच महिती अधिकारी कार्यकर्त्यांला खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून पकडले आहे. त्याशिवाय तुम्हाला मानसिक त्रास देणार आणि तुमच्या जीवाला धोका निर्माण करणार अशाही धमक्या कार्यकर्त्याने तक्रारदाराला दिल्या होत्या. तक्रारदाराने केलेल्या तक्रारी नंतर खंडणी विरोधी पथकाने सापळा रचला. पुण्यातील सातारा रोडवरील कदम प्लाझा या ठिकाणी हा सापळा रचण्यात आला होता.
उपनिरिक्षकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले
हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. 50 हजार रकमेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रार केलेल्या अर्जात मदत करतो आणि अडकलेले पैसे काढून देतो, असं सांगून 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. सागर पोमण असं या 35 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. पोलीसांकडूनच अशा प्रकारच्या लाचेची मागणी झाल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. तक्रारदाराचे आर्थिक व्यवहारात पैसे अडकले होते. त्यामुळे तक्रारदार त्रस्त होता. त्याचाच फायदा घेत आर्थिक व्यवहारांमध्ये अडकलेले पैसे परत मिळवून देतो सांगत लाचेची मागणी केली होती. तक्रारदार हे व्यवसायिक आहेत. त्यांचे 20 लाख मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराने लगेच लाचलुचपत विभागा तक्रार केली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर लाचलुचपच विभागाने कारवाईला सुरुवात केली.