एक्स्प्लोर

Pune Crime news : पुण्यातील नारायण पेठ हिट अँड रन प्रकरणी 2 जणांना बेड्या

पुण्यातील नारायण पेठ हिट अँड रन प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. भरधाव कारने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू प्रकरणात कार चालकासह साथीदारावर गुन्हा दाखल केला.

पुणे : पुण्यात सध्या गुन्हेगारी आणि बेसुमार वाहन (Pune Crime News) अ चालवणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील नारायण पेठ हिट अँड रन प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. भरधाव कारने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू प्रकरणात कार चालकासह साथीदारावर गुन्हा दाखल केला. अपघातावेळी कार चालक आणि साथीदार मद्यधुंद अवस्थेत असल्याचं उघडकीस आलं आहे.

भरधाव कारने पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजता वाजता पुण्यातील झेड ब्रीज जवळ घडली होती. वाहनचालक उमेश हनुमंत वाघमारे (वय 48) आणि नटराज बाबूराव सूर्यवंशी (वय 44) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11 वाजता केळकर रस्त्यावरून भरधाव कार टिळक चौकाकडे चालली होती. बाबा भिडे पुलाजवळील चौकापासून काही अंतरावर भरधाव कारने हिंदू महिला आश्रमाच्या जुन्या इमारतीच्या कोपऱ्याजवळ पाच ते सहा वाहनांना धडक दिली. त्यावेळी पादचारी विश्वनाथ राजोपाध्ये यांना कारची जोरात धडक बसली आणि अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजोपाध्ये यांचा मृत्यू झाला.या अपघातात एक कार, दोन रिक्षा आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले. यानंतर पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं गेलं. 

संतोष माने प्रकरणाची आठवण 

पुण्यात घडलेल्या या घटनेने 2012 सालच्या संतोष माने प्रकरणाची आठवण करून दिली.  25 जानेवारी 2012 मध्ये पुण्यातील स्वारगेट पीएमटी स्थानकातून एक बस पळवून नेत मनोरुग्ण असलेल्या संतोष मानेनं 9 जणांना चिरडलं होतं. तर 37 जण जखमी झाले होते. 

संतोष माने हा मूळचा उत्तर सोलापूर तालुक्यातील कवथळे गावचा होता. ड्रायव्हर म्हणून 13 वर्षांची सेवा झालेला संतोष स्वारगेट डेपोत नियुक्तीवर होता. 25 जानेवारी 2012 रोजी त्याने स्वारगेट डेपोतील एसटी बस ताब्यात घेतली. भर रस्त्यात बेफाम बस चालवून त्यानं 9 जणांना चिरडलं होतं, तर 37 जण जखमी झाले होते. शिवाजीनगर कोर्टात वर्षभर खटला चालला होता आणि 8 एप्रिल 2013 रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही दुर्मिळातील दुर्मिळ आणि अतिहिंसक घटना असल्याचं कोर्टानं नमूद केलं होतं.

इतर महत्वाची बातमी-

 Weather Update : मुंबई, पुण्यात तापमान वाढलं, सिक्कीमसह पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टी; येत्या काही तासांत मान्सून पूर्णपणे माघारी परतणार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget