एक्स्प्लोर

Pune Crime News : चीनचा कागद, आप्पा बळवंत चौकातील छपाई मशीन अन् 500 च्या बनावट नोटा; पोलिसांचा थेट छापा, एका मिनिटांत गेम खल्लास

पिंपरी चिंचवड, पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई  करणारी आणि त्या नोटा बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय.

पिंपरी चिंचवड, पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाचशे (PUNE CRIME)  रुपयांच्या बनावट नोटांची छपाई (Fake Currency) करणारी आणि त्या नोटा बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. धक्कादायक म्हणजे या टोळीकडून प्रिंटिंग मशीन ही ताब्यात घेण्यात आलंय. याच मशीनवर छपाई सुरू असताना देहूरोड पोलिसांनी सहा आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. त्यांच्याकडून 440 विक्रीसाठी तयार असणाऱ्या हुबेहूब, 4784 प्रिंट झालेल्या आणि एक हजार करन्सी पेपर ही जप्त केलेत. अलीबाबा या वेबसाईटच्या आधारे थेट चायना वरून या पेपरची खरेदी करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. नोटांची छपाई करणारी मशीनदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. 

आपल्या हातात असलेल्या 500 च्या नोटा खऱ्याच असतील यावर आता अनेकांचा विश्वास बसणं कठिण होणार आहे. कारण या भामट्यांनी हुबेहूब हिरव्या रंगाची तार असलेल्या नोटा तयार केल्या होत्या. पुण्यातील आप्पा बळवंत चौकात अनेक ठिकाणी प्रिंटिंगची कामं केली जातात. याच परिसरातून या भामट्यांनी छपाईची मशीन विकत घेतली होती आणि या मशीनच्या माध्यमातून ते नोटांची छपाई करत असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. 

चीनवरुन पेपरची खरेदी 

पुण्यात पर्दाफाश केलेल्या या टोळीने थेट चीनवरुन ऑनलाईन पद्धतीने या बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद खरेदी करण्यात आला होता.  अलीबाबा या वेबसाईटच्या आधारे हा कागद खरेदी केला होता. देहू रोड पोलिसांना बनावट नोटा  विक्री कऱण्यासाठी एक व्यक्ती मुकाई चौकात येत असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचना आणि थेट त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर तपास केला असता दिघी परिसरात या बनावट नोटांची छपाई सुरु असल्याचं त्यांना कळलं. त्यानंतर पोलिसांनी दिघी परिसरात छापा टाकला आणि रंगेहात सहा जणांना पकडलं आणि त्यांना अटक केली. त्यावेळी 440 हूबेहूब 500 च्या नोटा सापडल्या. त्यासोबतच 4484 कटिंग करण्यासाठी तयार असलेल्या नोटा त्यादेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

पोलिसांना धक्का

हा सगळा प्रकार पाहून देहू पोलिसांना मोठा धक्का बसला. त्यांनी सगळा मुद्देमाल जप्त केला आणि सहा जणांना अटक केली. या सहा जणांना पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र या नोटा कधीपासून छपाई केल्या जात होत्या आणि कुठे पुरवल्या जात होत्या?, याचा शोध पोलीस घेत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

बाजरी, ज्वारी पिकाआड करोडो रुपयांच्या गांजाची लागवड; गुन्हे शाखेच्या कारवाईने खळबळ

 
 
 
 
एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींचं भ्रष्टाचार प्रकरण! शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीचे खळबळजनक आरोप
पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींचं भ्रष्टाचार प्रकरण! शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीचे खळबळजनक आरोप
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
Pune Crime News: प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने सहा वर्षाच्या मुलाला संपवलं, प्रियकराच्या साथीने बनावही रचला, पण आजोबांमुळे फुटलं प्रकरणाचं बिंग, नेमकं काय घडलं?
प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने सहा वर्षाच्या मुलाला संपवलं, प्रियकराच्या साथीने बनावही रचला, पण आजोबांमुळे फुटलं प्रकरणाचं बिंग, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
Embed widget