Pune Crime news : विकृतीचा कळस! महिलेला कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार
Pune Crime news : महिलेला कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेल व्यवसायात भागिदारी करण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.
Pune Crime news : महिलेला कॉफीमध्ये गुंगीचे (pune news) औषध देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेल व्यवसायात भागीदारी (Pune crime) करण्याच्या बहाण्याने महिलेवर (rape) बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. खराडी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेने याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
अजयसिंग विजयसिंग ठाकूर असं 31 वर्षीय आरोपीचे नाव आहे. त्याता पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली होती. दुसऱ्या नोकरीच्या शोधात असताना त्याची एका मित्रमार्फत तक्रारदार महिलेशी ओळख झाली. त्यांची जवळीक वाढत होती. मैत्री असल्याने त्यांनी व्यवसायाबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. तक्रारदार महिलेचा केटरिंगचा व्यवसाय होता. त्यांनी दोघांनी हॉटेल सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
चर्चेसाठी घरी बोलवलं अन्
व्यवसायासंदर्भात काही दिवसांपासून त्यांच्यात चर्चा सुरु होती. याच चर्चेसाठी एकदिवस आरोपीने तक्रारदार महिलेला खराडी परिसरातील घरी बोलवलं. घरी आल्यानंतर व्यवसायासंदर्भात चर्चा केली त्याचदरम्यान आरोपीने तक्रारदार महिलेला कॉफीसाठी विचारणा केली महिलेने कॉफी घेण्यास होकार दिला. त्यात कॉफीतून गुंगीचं औषध महिलेला दिलं. त्यानंतर महिला बेशुद्ध अवस्थेत पडली. त्या दरम्यान आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचं समोर आलं.हा सगळा प्रकार तिच्या लक्षात आला असता, तिने पोलिस स्टेशन गाठले.
यापूर्वी देखील पुण्यातून अशीच घटना समोर आली होती. एका 33 वर्षीय महिलेला तरुणाने कोल्ड्रिंगमधून गुंगीचं औषध देत तिच्यावर बलात्कार केला होता. बलात्कार करतानाचा व्हिडीओदेखील त्या व्यक्तीने काढला होता. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यासोबतच फ्लॅट विक्रीचा बहाणा करुन 34 लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर आरोपीने मानसिक छळही केला होता. या त्रासाला कंटाळून महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली होती. या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला होता. सोहेल अजीम सय्यद (वय 32 वर्षे), अजीम सय्यद, रुकैया अजीम सय्यद, अहमद अजीम सय्यद (सर्व रा.कोंढवा,पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. ही घटना 2017 ते 2019 यादरम्यान घडली. बदनामीच्या भितीने महिलेने याबाबत उशिरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली होती. पुण्यात बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याचं असा घटनांमधून समोर येत आहे.