Pune Crime News : विकृतीचा कळस! अल्पवयीन मुलीच्या तोंडावर केली लघुशंका; पुण्यातील घृणास्पद घटना, एकाला बेड्या
घराजवळ खेळत असलेल्या सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या तोंडावर लघूशंका करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 18 वर्षीय मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारीत सध्या चांगलीच (Pune Crime News) वाढ झाली आहे. विकृतीतदेखील तेवढीच वाढ झाली आहे, अशातच विकृतीचा कळस गाठणारी घटना पुणे शहरातून समोर आली आहे. घराजवळ खेळत असलेल्या सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या तोंडावर लघूशंका करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 18 वर्षीय मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यावरुन तरुणावर विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवा भगवती चौधरी (वय १८, रा. अंबारी, नेपाळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. हा तरुण मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. नऱ्हे येथील भैरवनाथ मंदिर समोर ही सहा वर्षांची पीडित मुलगी खेळायला गेलेली होती. त्यावेळी फिर्यादी महिला म्हणजेच मुलीची आई घरामध्ये स्वयंपाक करत होती. थोड्या वेळाने ही लहान मुलगी रडत घरी आली. त्यावेळी ती प्रचंड प्रमाणात घाबरली होती. त्यावेळी तिच्या आईने तिला काय झालं विचारलं आणि मुलीचं उत्तर ऐकून आई थक्कच झाली. 'माझ्या तोंडावर मोठ्या दादाने शु केली' असं मुलीने सांगितलं.
त्यानंतर मुलीच्या आईने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हा आरोपी असलेला शिवा चौधरी स्वच्छतागृहामधून बाहेर पडताना दिसला. या सगळ्या संदर्भात आईने या शिवाकडे चौकशी केली असता. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
पुण्यात अल्पवयीन मुली असुरक्षित...
पुण्यातील आज घडलेल्या दुसऱ्या घटनेत कळस परिसरात एका 8 वर्षाच्या मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास कळस येथे घडला. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.आरोपी हा फिर्यादी यांच्या घराशेजारी राहतो. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या 8 वर्षाच्या मुलीला घरी घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यासोबत गैरवर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मुलीने याबाबत आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या दोन्ही प्रकरणामुळे पुण्यात अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे.
इतर महत्वाची बातमी-