Pune Crime : पुण्यात सासू-सुनेचं चक्रावून टाकणारं काम; डोक्यावर पिशवी घेत दोघीही विकायच्या गांजा अन्...
Pune news: पोलिसांना सोरतापवाडी परिसरात दोन महिला गांजा विकायला येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता.
![Pune Crime : पुण्यात सासू-सुनेचं चक्रावून टाकणारं काम; डोक्यावर पिशवी घेत दोघीही विकायच्या गांजा अन्... pune Crime news mother in law arrested for carrying bags of ganja on her head 20 kg ganja worth around 4 lakhs seized Pune Crime : पुण्यात सासू-सुनेचं चक्रावून टाकणारं काम; डोक्यावर पिशवी घेत दोघीही विकायच्या गांजा अन्...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/05/9d3db97f42a7c6fd609ed59a674b84911670239817686442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune crime news : सासू सुनेची भांडणं, त्यांच्यातली (pune crime) वादावादी बघितली असेल मात्र पुण्यात पहिल्यांदाच सासू सुनेची मिलीभगत बघायला मिळाली आहे. या सासू सुनेनी चक्क नायलॉनच्या पिशवीतून गांजा विकत (pune) असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या डोक्यावर असलेल्या पिशवीत 20 किलो गांजा होता. या दोघींचं हे कृत्य पाहून पोलिस देखील चक्रावलेच. दोघी मिळून पुण्यात गांजा विक्री करत होत्या. अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांच्याकडून चार लाख 12 हजार रुपये किंमतीचा 20 किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी या सासूसुनेच्या जोडीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सध्या बेसुमार गांजा विक्री सुरु आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधीपथकाकडून कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना दोन महिला डोक्यावर पिशव्या घेऊन जाताना दिसल्या. या पिशव्या नायलॉनच्या होत्या आणि सुतळीने बांधल्या होत्या. या दोन्ही महिलांवर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी महिलांची विचारपूस केली. दोन्ही महिलांनी आम्ही नात्यानं सासू आणि सून असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी पिशव्यांची तपासणी केली तर पिशव्यांमध्ये जांगा सापडला. या दोघींची चतुराई पाहून पोलिस देखील चक्रावून गेले.
दोघींकडून 20 किलो गांजा जप्त
सासूच्या डोक्यावर असणाऱ्या गांजाच्या पिशवीत 10 किलो 245 ग्राम गांजा तर सुनेच्या डोक्यावर असणाऱ्या पिशवीत 10 किलो 365 ग्रॅम गांजा सापडला. बेकायदेशीर रित्या गांजा विक्री करत असल्याने पोलिसांनी दोघींवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून एकून 20 किलो गांजाही जप्त केला आहे.
सापळा रचून सासू सुनेचा केला पोलिसांनी 'गेम'
पोलिसांना सोरतापवाडी परिसरात दोन महिला गांजा विकायला येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. अमली पदार्थ विरोधी पथक आणि पोलीस या दोघांनीही महिलांना गाठण्याचा प्लॅन केला. पोलिसांना दोन महिला डोक्यावर पिशवी घेऊन जाताना दिसल्या त्यावेळी पोलिसांनी दोघींना थांबवून दोघींची कठोर चौकशी केली. नायलॉनच्या पिशवीत काय आहे?, अशी विचारणा केली मात्र महिला उत्तर देत नव्हत्या. याचवेळी पोलिसांनी महिलांची पिशवी उघडली आणि त्यात पोलिसांना गांजा आढळला. दोघीही गांजा विक्रीसाठी जात असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी दोघींना अटक केली आहे आणि त्यांच्या गांजा विक्रीच्या साखळीचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)